संजय दत्त नव्हे तर या अभिनेत्याची 'साजन'साठी झालेली निवड, पण 'या' कारणामुळे नाकारला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:08 IST2025-01-09T17:06:53+5:302025-01-09T17:08:56+5:30

'साजन' चित्रपटासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्याला मिळालेली पहिली ऑफर; का दिला नकार?

bollywood actor aamir khan rejected saajan movie starrer sanjay dutt and salman khan and madhuri dixit know the reason | संजय दत्त नव्हे तर या अभिनेत्याची 'साजन'साठी झालेली निवड, पण 'या' कारणामुळे नाकारला सिनेमा

संजय दत्त नव्हे तर या अभिनेत्याची 'साजन'साठी झालेली निवड, पण 'या' कारणामुळे नाकारला सिनेमा

Saajan Movie:सलमान खान (salman Khan), माधुरी दीक्षित (madhuri Dixit)  आणि संजय दत्त (Sanjay Dutt) मुख्य भूमिकेत असलेला 'साजन' हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३३ वर्ष पूर्ण झाली आहेत.  लॉरेन्स डिसूझा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 'साजन'मध्ये सलमान खानने आकाश वर्मा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती तर माधुरी दीक्षित पूजा सक्सेनाच्या भूमिकेत दिसली. त्याचबरोबर अभिनेता संजय दत्तने  सागर हे पात्र साकारलं. या चित्रपटाचं कथानक त्यातील गाणी कलाकारांच्या अभिनय वाखणण्याजोगा होता. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचत सुभाष घईंच्या 'सौदागर'ला टक्कर दिली होती. प्रेमकहाणीवर आधारित असलेला या चित्रपटात पूजा, आकाश आणि सागर यांचा लव्ह ट्रॅंगल पाहायला मिळाला. 

'साजन' चित्रपट ३१ ऑगस्ट १९९१ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. परंतु 'साजन'मध्ये सागरच्या भूमिकेसाठी संजय दत्तआधी आमिर खानला ऑफर करण्यात आली होती. पण, आमिर खानला चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यानंतर संजय दत्तची चित्रपटात वर्णी लागली. या चित्रपटाने अभिनेत्याला वेगळाच स्टारडम मिळवून दिला. त्यासोबत माधुरी आणि सलमानच्या करिअरला सुद्धा कलाटणी मिळाली. 

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार जगभरात या सिनेमाने १८.३५ कोटी इतकी कमाई केली होती. आज इतकी वर्षे उलटूनही या चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली नाही. 

Web Title: bollywood actor aamir khan rejected saajan movie starrer sanjay dutt and salman khan and madhuri dixit know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.