शुभमंगल सावधान! लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अडकला लग्नबेडीत;अजय देवगणसोबत केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:45 IST2025-11-28T13:41:00+5:302025-11-28T13:45:23+5:30
'दे दे प्यार दे' फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, फोटो शेअर करत म्हणाला...

शुभमंगल सावधान! लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अडकला लग्नबेडीत;अजय देवगणसोबत केलंय काम
Bhavin Bhanushali: मराठीसह हिंदी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत.त्यात आता बॉलिवू़ड अभिनेता, गायक भाविन भानुशाली विवाहबंधनात अडकला आहे. ‘दे दे प्यार दे’, ‘इश्क पश्मिना’, ‘वेल्लापंती’ या चित्रपटांमध्ये काम करुन चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
नुकतेच भाविन भानुशालीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नातील काही सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. भाविनने
काल एका खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. दरम्यान, भाविनने इन्स्टाग्रामवर ‘Tu maari ne hoon taaro thai gayo. 27.11.25’ असं कॅप्शन देत लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. सर्व फोटोंमध्ये भाविन आणि त्याची पत्नी दोघेही हसत लग्नाच्या विधी करताना दिसत आहेत.
भाविनने त्याच्या लग्नामध्ये आयवही रंगाची शेरवानी घातली होती, तर त्याच्या पत्नीने पारंपरिक लाल लेहेंगा निवडला होता. या कपड्यांबरोबर मॅचिंग दागिने घालून तिने तिचा लूक पूर्ण केला होता. पारंपरिक पद्धतीने दोघांचं लग्न झालं. लग्नात दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.सध्या या नवोदित जोडप्याला त्यांचे चाहते आणि कलाकार मंडळी शुभाशिर्वाद देताना दिसत आहेत.
वर्कफ्रंट
भाविन भानुशाली लोकप्रिय अभिनेता आहे. तो अजय देवगणबरोबर ‘दे दे प्यार दे’मध्ये झळकला होता. या चित्रपटात त्याने अजय देवगणच्या मुलाची भूमिका केली होती. याशिवाय अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.