जगभरात गाजलेला सर्वात बोल्ड सिनेमा, भारतात मात्र झालेला बॅन; संगीत द्यायला ए आर रहमानचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:26 IST2026-02-20T16:25:17+5:302026-02-20T16:26:41+5:30
कोणता आहे हा सिनेमा?

जगभरात गाजलेला सर्वात बोल्ड सिनेमा, भारतात मात्र झालेला बॅन; संगीत द्यायला ए आर रहमानचा नकार
जगभरात दर दिवशी एकापेक्षा एक कंटेंट बनतो. प्रत्येक कंटेंट वेगवेगळ्या जॉनरचा असतो. त्यातच असा एक बोल्ड सिनेमा जो भारतात बॅन करण्यात आला होता. त्या सिनेमा जगभरात मात्र धुमाकूळ घालता होता. १९९६ साली भारतीय सिनेमाच्या इतिहासातला हा सर्वात बोल्ड सिनेमा होता. तसंच सिनेमाचं नावही बोल्डच होतं. कोण आहे हा सिनेमा?
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
प्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात १६ व्या दशकातील भारताची गोष्ट होती. सेन्सॉर बोर्डाने मर्यादेविरोधातला कंटेंट म्हणते तो बॅन केला होता. तोच इंटनॅशनल फेस्टिवलमध्ये मात्र सिनेमा स्टँडिंग ओवेशन मिळालं. याच्या संगीतानेही मन जिंकलं. हा आहे 'कामसूत्र : अ टेल ऑफ लव्ह' सिनेमा. १६ व्या दशकातील भारताची एक सुंदर कहाणी यात दाखवण्यात आली. नावावरुन बोल्ड फिल्म सिनेमा वाटणारा खरं तर पॅशन, विश्वासघात आणि स्वत:चाच शोध घेणारा आहे. सुमारे दोन तासांच्या या सिनेमाचं शूट राजस्थानातील आलिशान महल आणि किल्ल्यांवर झालं आहे. हा सिनेमा पाहता थेट आपण राजा-महाजारांच्या काळात जातो.
ही गोष्ट तारा आणि माया या दोन मैत्रिणींची आहे. तारा एक राजकुमारी आहे आणि माया तिची दासी. मात्र लहानपणापासूनच दोघी एकत्र राहिल्या आहेत. गोष्टीत तेव्हा ट्विस्ट येतो जेव्हा ताराचं लग्न राजकुमार राज सिंहशी ठरतं. पण राजाला माया आवडते आणि तो तिला खास दरबारी बनवतो. इथूनच इर्ष्या, बदल्याची भावना आकार घेते. त्या काळात महिला कशाप्रकारे सत्ता आणि आपल्या इच्छांमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करायच्या हेच हा सिनेमा दाखवतो. हे फक्त शारिरीक आकर्षण नाही तरव भावनांची गुंतागुंत दाखवणारीही गोष्ट आहे.
विशेष म्हणजे या सिनेमासाठी मीरा नायर यांना ए आर रहमानला संगीत दिग्दर्शक म्हणून घ्यायची इच्छा होती. मात्र रहमान यांनी ऑफर नाकारली. सिनेमाची कथा आणि त्यातील बोल्ड सीन्स हे आपल्या इमेजच्या विरोधात आहेत असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी नकार दिला. त्या काळात भारतात सेक्शुअॅलिटीबद्दल बरेच निर्बंध होते. रहमान यांनी नकार दिल्यानंतर मायकल डैना यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. सिनेमा भारतात बॅन झाला मात्र जगभरात याची वाहवाही झाली.