हेमा मालिनींसोबत नाही राहत धर्मेंद्र? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलं; म्हणाला-"त्यांचं वय झालंय त्यामुळे…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:07 IST2025-10-13T12:01:09+5:302025-10-13T12:07:13+5:30
हेमा मालिनींसोबत नाहीतर 'या' ठिकाणी राहतात धर्मेंद्र! बॉबी देओल खुलासा करत म्हणाला...

हेमा मालिनींसोबत नाही राहत धर्मेंद्र? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलं; म्हणाला-"त्यांचं वय झालंय त्यामुळे…"
Bobby Deol: हिंदी सिनेसृष्टीत अॅक्शन चित्रपटांचा उल्लेख केला तर अभिनेते धर्मेंद्र यांचं नाव डोळ्यासमोर येतं. त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, त्यांच्या चित्रपटांइतकीच लव्ह लाईफची सुद्धा चर्चा झाली. पहिलं लग्न झालेलं असताना त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत संसार थाटला. त्यावेळी त्यांची प्रेम कहाणी खूप गाजली. यादरम्यान,त्यांना असंख्य अडचणींना समोरं जावं लागलं, मात्र त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करुन नव्या आयुष्याला सुरुवात केली. धर्मेंद्र यांच्याप्रमाणे त्यांची मुलं सनी आणि बॉबी देओलने देखील इंडस्ट्रीत स्वत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशातच एका मुलाखतीत त्यांचा धाकटा मुलगा बॉबी देओलने आई-वडिलांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
अलिकडेच बॉबी देओलने 'एबीपी लाईव्ह'सोबत संवाद साधला. त्यादरम्यान, त्याला धर्मेंद्र यांच्या त्या सोशल मिडिया पोस्टबद्दल विचारण्यात आलं. त्या पोस्टमध्ये हि-मॅन धर्मेंद्र यांनी ते एकटे पडले आहेत, असं म्हटलं होतं. त्याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, माझे आई-वडील दोघेही एकत्र राहत आहेत. सध्या ते खंडाळा येथील आमच्या फार्महाऊसवर आहेत. तुम्हाला तर माहितीये पप्पांचा स्वभाव थोडा फिल्मी आहे. त्यांना आता फार्महाऊसवर राहायला आवडतं. शिवाय त्यांचं वय झालंय त्यामुळे तिथे राहणं त्यांच्यासाठी आरामदायी आहे. तिथलं हवामान सुद्धा छान आहे, सगळं काही व्यवस्थित आहे.
त्यानंतर बॉबी देओल म्हणाला," माझे बाबा खूप भावनिक आहेत.त्यामुळे ते त्यांना कायम व्यक्त व्हायला आवडतं. याबद्दल मी जर कधी त्यांनी विचारलं की तुम्ही हे जे काही लिहिलंय किंवा म्हटलंय ते का करता. तर त्याचं म्हणणं हेच असतं की ते फक्त त्यांच्या मनाचं ऐकतात." असा खुलासा अभिनेत्याने मुलाखतीमध्ये केला.
दरम्यान,बॉबी देओलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.