'हा' युट्यूबर करण जोहरच्या चित्रपटातून करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण, महाराष्ट्राशी खास कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 12:33 IST2025-10-26T12:32:49+5:302025-10-26T12:33:32+5:30
युट्यूबरने स्वतः सोशल मीडियावर या बातमीची अधिकृत घोषणा करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

'हा' युट्यूबर करण जोहरच्या चित्रपटातून करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण, महाराष्ट्राशी खास कनेक्शन!
सध्या मनोरंजन विश्वात 'डिजिटल स्टार्स'ची चलती आहे. अनेक लोकप्रिय युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आता थेट बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. अशातच आता भारतातील सर्वात प्रसिद्ध युट्यूबरपैकी एक असलेला भुवन बाम लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. युट्यूबनंतर आता भुवन बाम बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार आहे. तो चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या चित्रपटातून थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. भुवनने स्वतः सोशल मीडियावर या बातमीची अधिकृत घोषणा करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
भुवनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "स्वप्ने बघा मित्रांनो, ती नक्कीच पूर्ण होतात!". भुवनच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून त्याचे अभिनंदन केले आहे. यामध्ये अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री प्रतिभा रणता आणि तन्मय भट यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुवन बाम ज्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, तो एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट असणार आहे. दिग्दर्शक: या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा (Sharan Sharma) करणार आहेत, ज्यांनी यापूर्वी 'गुंजन सक्सेना' (Gunjan Saxena) सारखा यशस्वी चित्रपट दिला आहे. या चित्रपटात भुवन बामसोबत अभिनेत्री वामिका गब्बी स्क्रीन शेअर करणार असल्याचे बोलले जात आहे. भुवन बामने यापूर्वी 'ताजा खबर' (Taaza Khabar) आणि 'द रिव्होल्युशनरीज' (The Revolutionaries) सारख्या वेब सीरिजमधून ओटीटीवर आपले अभिनयकौशल्य दाखवले आहे.
भुवन बामनं कोणतीही प्लॅनिंग न करताच स्वतःचं 'BB ki Vines' हे युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. हळू-हळू युट्यूबवर त्याच्या व्हिडीओंना प्रसिद्धी मिळू लागली आणि त्यानंही त्यानंतर पूर्ण वेळ व्हिडीओ तयार करण्यासाठी द्यायला सुरुवात केली. आज या चॅनेलचे २६.६ मिलियन म्हणजेच जवळपास कोट्यवधी सब्सक्रायबर्स आहेत. भुवन बाम पहिला भारतीय युट्यूबर होता ज्याचे १ कोटीपेक्षा जास्त सब्सक्रायबर झाले होते.