'हेरा फेरी ३' मुळे बिनसलं? अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल परेश रावल यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:48 IST2026-04-09T11:44:02+5:302026-04-09T11:48:19+5:30

"काही वेळा तुम्ही जवळच्या लोकांना...", अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल परेश रावल काय म्हणाले?

bhoot bangla actor paresh rawal reaction on friendship with akshay kumar and priyadarshan | 'हेरा फेरी ३' मुळे बिनसलं? अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल परेश रावल यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले... 

'हेरा फेरी ३' मुळे बिनसलं? अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल परेश रावल यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले... 

Paresh Rawal: बॉलिवूड अभिनेते परेश रावल सध्या त्यांचा आगामी चित्रपट भूत बंगला मुळे चर्चेत आहेत. प्रियदर्शन यांचं दिग्दर्शन असलेलं हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता आणखी वाढल्याचं दिसतंय. या सिनेमातअक्षय कुमारसहपरेश रावल, तब्बू, मिथिला पालकर आणि वामिका गब्बी अशा कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार, परेश रावल आणि प्रियदर्शन हे त्रिकुट बऱ्याच काळानंतर एकत्र येत आहेत. याआधीही या तिघांनी गरम मसाला, भूल भुलैया, भागम भाग, हेरा फेरी, हंगामा आणि हंगामा 2 असे अनेक हिट कॉमेडी चित्रपट दिले आहेत.तसेच या चित्रपटात परेश रावल आणि तब्बू देखील अनेक वर्षानंतर  एकत्र दिसणार आहेत.

अशातच नुकत्याच 'पीटीआय' ला दिलेल्या एका मुलाखतीत परेश रावल यांनी चित्रपट आणि प्रियदर्शन तसेच अक्षय कुमारसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. ते म्हणाले, पुन्हा एकदा एकत्र काम करताना खूप मजा आली. आयुष्यात काही गोष्टींसाठी वाट पाहणं योग्य असतं.जेव्हा तुम्ही चांगल्या लोकांसोबत काम करता, तेव्हा प्रवासही  उत्तम होतो. अशा लोकांच्या सोबत राहिल्याने आरोग्यही उत्तम राहतं.

भूत बंगला आणि भूल भूलैयाच्या तुलनेवर म्हणाले...

'भूत बंगला' या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमधील चोमू पॅलेसमध्ये झालंय. जिथे  'भूल भुलैया'चेही शू्टिंग झालं होतं.मात्र, यावेळी परेश रावल यांनी हे देखील स्पष्ट केलं दोन्ही चित्रपटांचं कथानक पूर्णपणे वेगळं आहे. त्यांनी सांगितलं, "या चित्रपटात ज्या ठिकाणी एक भूत राहतं, तिथे  एक लग्न होतं असं दाखवण्यात आलं आहे. पुढे काय होऊ शकते याची तुम्ही कल्पना करू शकता. हा एक सुंदरपणे साकारलेला सिनेमा आहे.

प्रियदर्शन आणि अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल काय म्हणाले?

प्रियदर्शनचे कौतुक करताना परेश रावल म्हणाले,"मी त्यांच्यासारखे फार कमी दिग्दर्शक पाहिले आहेत. जर ते म्हणाले की चित्रीकरण १० दिवसांत संपेल, तर ते अवघ्या नऊ दिवसांतच ते पूर्ण करतात. कामाच्या बाबतीत त्यांची स्पष्टता असते. एवढ्या चांगल्या दिग्दर्शकापासून दूर  राहणं योग्य नाही.त्यानंतर मी जेव्हा सेटवर आलो तेव्हा पूर्वीसारखीच खूप मजा केली."

दरम्यान, 'हेरा फेरी ३' ची घोषणा झाल्यानंतर परेश रावल यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे अक्षय आणि परेश रावल यांच्यामध्ये वाद झाल्याचं बोललं गेलं. त्यानंतर सगळ्या गोष्टी सुरुळित झाल्या आणि परेश रावल यांची सिनेमात पुन्हा एन्ट्री झाली. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर याचा त्यांच्या मैत्रीवर काही परिणाम झाला का? याबद्दल विचारलं असता परेश रावल म्हणाले,"मुद्दा मैत्रीचा नाही. या सगळ्याचा आमच्या मैत्रीवर कधीच परिणाम झाला नाही. पण, कधी कधी या गोष्टी घडतात. काही वेळा तुम्ही जवळच्या लोकांना गृहित धरता, पण, आमच्यात कोणतंही वैर नाही." असा खुलासा अभिनेत्याने केला.

Web Title : 'हेरा फेरी 3' विवाद के बीच परेश रावल ने अक्षय कुमार से दोस्ती पर सफाई दी।

Web Summary : परेश रावल ने अपनी आने वाली फिल्म 'भूत बंगला', अक्षय कुमार और निर्देशक प्रियदर्शन के साथ काम करने पर बात की। उन्होंने 'हेरा फेरी 3' के कारण मनमुटाव की अफवाहों को संबोधित करते हुए स्पष्ट किया कि उनके और कुमार के बीच कोई दुश्मनी नहीं है; उनकी दोस्ती बरकरार है।

Web Title : Paresh Rawal clarifies friendship with Akshay Kumar amidst 'Hera Pheri 3' rumors.

Web Summary : Paresh Rawal discusses his upcoming film, 'Bhoot Bungla', working with Akshay Kumar and director Priyadarshan. He addressed rumors of a rift due to 'Hera Pheri 3', clarifying that no animosity exists between him and Kumar; their friendship remains intact.