टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:16 IST2025-11-22T16:15:17+5:302025-11-22T16:16:18+5:30
मालिकेचा सिनेमा होणं असं पहिल्यांदाच घडत आहे.

टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी हिंदी मालिका 'भाभीजी घर पर है' चे असंख्य चाहते आहेत. यामध्ये आसिफ शेख, रोहिताश गौर, शुभांगी अत्रे आणि इतर कलाकार आहेत. यातील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिकलं. अंगुरी भाभीचा 'सही पकडे है' डायलॉग गाजला. एकंदर मालिकेने सर्वांना खळखळून हसवलं. प्रेक्षकांच्या या लाडक्या मालिकेवर आता सिनेमा येणार आहे.
मालिकेचा सिनेमा होणं असं पहिल्यांदाच घडत आहे. 'भाभीजी घर पर है' सिनेमा पुढील वर्षी ६ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना विनोदाच्या रोलरकोस्टरवर घेऊन जाईल. सिनेमा मालिकेतील कलाकारांसोबत रवी किशन, मुकेश तिवारी आणि निरहुआ यांची भूमिका आहे जे या कॉमेडी एंडव्हेंचरला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील. मेकर्सने सोशल मीडियावर सिनेमाची घोषणा केली आहे. यामुळे आता चाहतेही मालिकेतील या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
'भाभीजी घर पर है' ही मालिका २०१५ मध्ये सुरु झाली होती. दोन शेजाऱ्यांवर ही कथा होती. शेजारी शेजारी असलेले मिश्रा कुटुंबातील कपल आणि तिवारी कुटुंबातील कपल यांच्यावर ही गोष्ट होती. आता हेच बिग स्क्रीनवर पाहताना किती हसू येणार याची उत्सुकता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मालिकेच्या दुसऱ्या भागाचीही चर्चा होती. यामध्ये शिल्पा शिंदेला मेकर्स परत आणण्याच्या विचारात आहेत. शिल्पा शिंदेने पहिल्या वर्षी अंगुरी भाभीची भूमिका साकारली आणि तिने एका वर्षात मालिका सोडली होती. नंतर तिच्या जागी अभिनेत्री शुभांगी अत्रे दिसली होती.