अवघ्या १५ दिवसांचं शूटिंग, तीन कलाकारांनी गाजवलं थिएटर! 'हा' हॉरर सिनेमा पाहून भल्याभल्यांना फुटेल घाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:12 IST2025-09-20T16:06:21+5:302025-09-20T16:12:11+5:30
तीन कलाकार अन् १५ दिवस शूट, 'हा' हॉरर सिनेमा पाहून डोकं चक्रावेल

अवघ्या १५ दिवसांचं शूटिंग, तीन कलाकारांनी गाजवलं थिएटर! 'हा' हॉरर सिनेमा पाहून भल्याभल्यांना फुटेल घाम
Bollywood Movie: बदलत्या काळानुसार हल्ली हॉरर चित्रपटांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये प्रचंड वाढली आहे. रोमॅन्टिक, अॅक्शन थ्रिलर चित्रपटांप्रमाणेच लोक अशा चित्रपटांसाठी उत्साहाने थिएटर किंवा ओटीटीकडे धाव घेतात. अनेकजण हॉरर सिनेमे मोठ्या आवडीने पाहतात. अशाच एका हॉरर थ्रिलर सिनेमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. १९९९ मध्ये आलेल्या सिनेमाला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली होती. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने दबदबा निर्माण केला होता. या चित्रपटाचं नाव कौन आहे. या चित्रपटात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने प्रमुख साकारली आहे.
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित चित्रपटात उर्मिला मातोंडकरच्या पात्राचं शेवटपर्यंत कळतच नाही. सगळे तिला मॅडम म्हणून हाक मारत असतात. याची कथा अनुराग कश्यपने लिहिली आहे. विशेष म्हणजे कौन चित्रपटात उर्मिला मातोंडकरसह मनोज वाजपेयी आणि सुशांत सिंह हे कलाकार आहेत. शिवाय अवघ्या १५ दिवसांत हा चित्रपट शूट करण्यात आला होता, असंही म्हटलं जातं. आजही जेव्हा हॉरर चित्रपटांचा उल्लेख केला जातो तेव्हा या चित्रपटाचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
'कौन' या चित्रपटाला समीक्षकांसह चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. IMDb वर चित्रपटाला ७.८ रेटिंग मिळाले आहे. तुम्ही हा चित्रपट YouTube वर देखील पाहू शकता.