वेबसीरिजमध्ये किसिंग सीन करायचा होता, अभिनेत्याने थेट बायकोच्या आई-बाबांना फोन लावला, आणि नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:05 IST2025-07-17T13:00:19+5:302025-07-17T13:05:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्याचा हा खास किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या अभिनेत्याने किसिंग सीन करण्याआधी बायकोच्या आई-बाबांना फोन लावला. नंतर काय झालं बघा

Before kissing scene ravi dubey called wife ramayan actor sargun mehra husband | वेबसीरिजमध्ये किसिंग सीन करायचा होता, अभिनेत्याने थेट बायकोच्या आई-बाबांना फोन लावला, आणि नंतर...

वेबसीरिजमध्ये किसिंग सीन करायचा होता, अभिनेत्याने थेट बायकोच्या आई-बाबांना फोन लावला, आणि नंतर...

मनोरंजन विश्वात अनेकदा कलाकारांना बोल्ड सीन करावे लागतात. प्रोफेशनचा भाग असल्याने या कलाकारांना किसिंग सीन द्यावे लागतात. पण एका कलाकाराने किसिंग सीन करण्याआधी चक्क त्याच्या सासू-सासऱ्यांना फोन लावला होता. हा अभिनेता आहे रवी दुबे. अभिनेत्री सरगुन मेहता आणि अभिनेता रवि दुबे हे खऱ्या आयुष्यात पती-पत्नी आहेत. दोघंही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. रवी दुबेने ‘जमाई राजा 2.0’ या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. या शोमध्ये रवीला एक किसिंग सीन करायचा होता. तेव्हा काय घडलं बघा

रवीने केला बायकोच्या आई-बाबांना फोन

शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये रवीची बायको आणि अभिनेत्री सरगुनने हा खास किस्सा सांगितला आहे. सरगुनच्या मते, जेव्हा स्क्रीप्टनुसार रवीला किसिंग सीन करायचा होता, तेव्हा त्याला सरगुनच्या कुटुंबीयांना विश्वासात घेण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने शूटिंगपूर्वी सरगुनच्या आई-वडिलांना स्वतः फोन करून त्यांची परवानगी घेतली होती. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, "मी सरगुनचा खूप आदर ठेवतो. पण हा एक प्रोफेशनल सीन आहे त्यामुळे तो करण्याआधी मला तुम्हाला सांगणं आवश्यक आहे."

रवीच्या या कृतीमुळे सरगुन खूप भावूक झाली होती. ती म्हणते, “त्या क्षणी मला जाणवलं की एक पती म्हणून रवी केवळ माझा नवरा नाही, तर माझ्या कुटुंबाचाही आदर करणारा एक जबाबदार माणूस आहे. त्याचं हे वागणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं.” अशाप्रकारे सरगुनने रवीचा हा खास किस्सा सर्वांसोबत शेअर केला.


रणबीरच्या 'रामायण'मध्ये झळकणार रवी

रवी दुबे हा तोच कलाकार आहे जो रणबीर कपूरच्या आगामी 'रामायण' सिनेमात झळकणार आहे. 'रामायण' सिनेमात रवी दुबे हा लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे. यानिमित्त रवी पहिल्यांदाच बिग बजेट बॉलिवूड सिनेमात काम करणार आहे. या सिनेमात रवीला पाहायला त्याचे खूप उत्सुक आहेत, यात शंका नाही. 'रामायण' हा सिनेमा पुढील वर्षी दिवाळीत अर्थात २०२६ ला रिलीज होणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

Web Title: Before kissing scene ravi dubey called wife ramayan actor sargun mehra husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.