15 वर्षांच्या दुश्मनीनंतर बादशाहने हनीसमोर मैत्रीचा हात पुढे केला, लोकप्रिय रॅपरचे पॅचअप होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 08:56 AM2024-05-26T08:56:54+5:302024-05-26T08:57:20+5:30

हनी सिंगसोबतचा वाद मिटवण्यासाठी बादशाहने पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं.

Badshah Wants To End The Fight With Honey Singh After 15 Years | 15 वर्षांच्या दुश्मनीनंतर बादशाहने हनीसमोर मैत्रीचा हात पुढे केला, लोकप्रिय रॅपरचे पॅचअप होणार?

15 वर्षांच्या दुश्मनीनंतर बादशाहने हनीसमोर मैत्रीचा हात पुढे केला, लोकप्रिय रॅपरचे पॅचअप होणार?

बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध रॅपर म्हणून हनी सिंग व बादशाह यांचं वर्चस्व आहे. या दोघांमधील वादही सर्वश्रूत आहे. कधीकाळी दोघे एकमेकांचे जीवाभावाचे मित्र होते. दोघांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट गाणी आणि रॅप गायली. पण  दोघांमध्ये वाद झाला आणि जिवाभावाच्या नात्यात कटुता निर्माण झाली. हनी आणि बादशाह या दोघांचे जगभरात फॅन आहेत. जर हे दोघे एकत्र आले तर चाहत्यांना काय आनंद होईल हे सांगायलाच नको. दोन्ही रॅपरने आपसातील वाद विसरून एकत्र यावं अशी चाहत्यांची इच्छा लवरकरच पुर्ण होणार असल्याचं दिसून येत आहे. 

हनी सिंगसोबतचा वाद मिटवण्यासाठी बादशाहने पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं.  बादशाहने मतभेद बाजूला ठेवून हनी सिंगसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. नुकतेच त्यानं डेहराडूनमध्ये ग्राफफेस्ट 2024 मध्ये परफॉर्मन्स दिला. यावेळी कॉन्सर्टमध्येच थांबवत बादशाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.  हनी सिंगसोबतचा वाद मिटवण्याची इच्छा बादशाहनं व्यक्त केली.  ऐवढंच नाही तर त्याने हनी सिंगला शुभेच्छादेखील दिल्या. 

बादशाह म्हणाला की, 'आयुष्यात एक काळ असा होता. जेव्हा मी हनी सिंगचा प्रंचड राग होता. पण आता मी त्यातून सावरलो आहे आणि नवीन सुरुवात करण्याची माझी इच्छा आहे. काही गैरसमज झाल्याने मी दु:खी होतो, पण मला जाणवलं की, 'जेव्हा आम्ही  दोघे एकत्र होतो, तेव्हा आम्हाला वेगळं करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. तर आम्हाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करणारे फार थोडे होते, तर आज मी सर्वांना सांगू इच्छितो की मी माझ्या आयुष्यातील तो टप्पा मागे सोडला आहे आणि मी हनी सिंगला शुभेच्छा देतो'. 

हनी सिंग आणि बादशाह यांच्या मैत्रीत  2009 मध्ये दुरावा निर्माण झाला होता. या आधी दोघे खूप चांगले मित्र होते. त्यांनी मिळून माफिया मुंडेर नावाचा बँड तयार केला होता. ज्याला लोकांनी खुप पसंतही केलं होतं. ‘खोल बोतल’, ‘बेगानी नार बुरी’, ‘दिल्ली के दीवाने’ असे हिट गाणे यांच्या जोडीने दिले, जे आजही लोकप्रिय आहेत. जो 2012 मध्ये बंद झाला होता. हनी आणि बादशाह यांच्या मैत्रीत वादाची ठिणगी पडली आणि 2012 मध्ये हा बँड फुटला. त्यानंतर दोघांमध्ये खुप वादही झाले. या वादानंतर दोघांची जोडी कधीच एकत्र आली नाही. आता चाहत्यांना दोघांना एकत्र पाहण्याची उत्सुकता आहे. 

Web Title: Badshah Wants To End The Fight With Honey Singh After 15 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.