बॉलिवूडचा अल्लू अर्जुन बनू शकतो 'हा' अभिनेता; दिग्दर्शक कलीस म्हणाले, "त्याच्यात कमर्शियल..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:22 IST2024-12-19T16:21:39+5:302024-12-19T16:22:20+5:30

दाक्षिणात्य दिग्दर्शकाने केली बॉलिवूड अभिनेत्याची स्तुती

baby john director kalees said varun dhawan is perfect commercial hero can become allu arjun of bollywood | बॉलिवूडचा अल्लू अर्जुन बनू शकतो 'हा' अभिनेता; दिग्दर्शक कलीस म्हणाले, "त्याच्यात कमर्शियल..."

बॉलिवूडचा अल्लू अर्जुन बनू शकतो 'हा' अभिनेता; दिग्दर्शक कलीस म्हणाले, "त्याच्यात कमर्शियल..."

अल्लू अर्जुन (Allu Arjun) 'पुष्पा' सिनेमामुळे ग्लोबल स्टार बनला आहे. भारतातच नाही तर जगात त्याची चर्चा आहे. 'पुष्पा:द राइज' आणि आता आलेल्या 'पुष्पा २: द रुल' मुळे त्याने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डच सेट केला आहे. बॉलिवूड कलाकारही साऊथचा एकापेक्षा एक धमाका पाहून थक्क आहेत. दरम्यान बॉलिवूडचाअल्लू अर्जुन बनू शकतो असा एक हिरो आहे ज्याच्यात ती क्षमता आहे असं नुकतंच दिग्दर्शक कलीस यांनी वक्तव्य केलं. कोण आहे तो हिरो?

साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक कलीस (Kalees) यांचा 'बेबी जॉन' हा हिंदी सिनेमा प्रदर्शित होत आहे. अॅटली आणि त्याची पत्नी प्रिया अॅटलीने सिनेमाची निर्मिती केली आहे. वरुण धवन यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक कलीस यांनी वरुण धवनची (Varun Dhawan) खूप स्तुती केली असून त्याच्यामध्ये बॉलिवूडचा अल्लू अर्जुन बनण्याची क्षमता आहे असं सांगितलं. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कलीस म्हणाले, "वरुण ज्याप्रकारे डान्स, अभिनय करतो त्यावरुन त्याच्यात कमर्शियल हिरो बनण्याचे सगळे गुण आहेत. मला वाटतं बॉलिवूडमध्ये एक अल्लू अर्जुनची जागा रिकामी आहे जी वरुण भरुन काढू शकतो."

ते पुढे म्हणाले, "हृतिक रोशन सर आणि इतरही प्रतिभावान अभिनेते आहेत यात शंका नाही पण आता बॉलिवूडमध्ये तशा मास अॅक्शन फिल्म्स कोणीच करत नाहीए. सगळेच रिअलिस्टिक सिनेमे बनत आहेत. त्यामुळे अल्लू अर्जुनची जागा वरुण धवन पुढल्या काळात नक्कीच भरुन काढू शकतो."

याबद्दल वरुण धवनला विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, "मी नेहमीच असे सिनेमे करण्याचा प्रयत्न केला जे लहान मुलंही बघू शकतील आणि एन्जॉय करु शकतील." बेबी जॉन मध्ये वरुण धवनने छोट्या मुलीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. लेकीच्या सुरक्षेसाठी त्याचे जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्सही पाहायला मिळत आहेत. २५ डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित होत आहे.

Web Title: baby john director kalees said varun dhawan is perfect commercial hero can become allu arjun of bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.