आधी छतावर चढला, नंतर शर्ट काढून सिक्स पॅक दाखवले अन्...; टायगर श्रॉफचा व्हिडीओ तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:54 IST2025-09-08T12:51:13+5:302025-09-08T12:54:27+5:30
टायगर श्रॉफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ पाहून टायगरच्या चाहत्यांनी त्याचं चांगलंच कौतुक केलंय

आधी छतावर चढला, नंतर शर्ट काढून सिक्स पॅक दाखवले अन्...; टायगर श्रॉफचा व्हिडीओ तुफान व्हायरल
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस आणि ॲक्शनसाठी ओळखला जातो. अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपले सिक्स पॅक ॲब्स दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओने त्याच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. नुकतंच 'बागी ४' सिनेमाच्या प्रमोशननिमित्त टायगर श्रॉफ बांद्रा येथील गैयटी गॅलेक्सी थिएटरमध्ये गेला होता. तिथला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
टायगर श्रॉफचा व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ एका कार्यक्रमात टी-शर्ट काढून आपल्या चाहत्यांना 'हाय, हॅलो' करताना दिसत आहे. त्यावेळी टायगरचा टी-शर्ट त्याच्या एका चाहत्याने मागितला आणि टायगरने तो काढून त्याच्या दिशेने फेकला. यानंतर टायगरला सिक्स पॅक ॲब्समध्ये पाहून चाहते खूप उत्साहित झाले आणि त्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. टायगरने सुद्धा त्याच्या चाहत्यांच्या जल्लोषात उत्साहात सहभागी झाला. टायगरच्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी चांगलंच प्रेम दर्शवलं आहे. अभिनेता त्याच्या चाहत्यांची किती काळजी घेतो, अशा कमेंट्स करत लोकांनी टायगरच्या व्हिडीओला पसंती दिली आहे.
टायगरचा हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. त्याचे चाहते त्याच्या फिटनेसची आणि मेहनतीची खूप प्रशंसा करत आहेत. टायगरचा नुकताच नवीन सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाचं नाव आहे 'बागी ४'. या सिनेमात टायगर श्रॉफसोबत संजय दत्त, हरनाज संधू, सोनम बाजवा हे कलाकार झळकत आहेत. या सिनेमाने तीन दिवसात ३० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.