Anek Trailer : अनेक ट्रेलर पाहिले असतील पण हा ‘अनेक’ वेगळा आहे, पाहा धमाकेदार ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:00 IST2022-05-05T14:57:45+5:302022-05-05T15:00:22+5:30
Ayushmann Khurrana First Action Film Anek Trailer : आयुष्यमान खुराणाला मोठ्या पडद्यावर मिस करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, आयुष्यमानचा ‘अनेक’ नावाचा नवा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय.

Anek Trailer : अनेक ट्रेलर पाहिले असतील पण हा ‘अनेक’ वेगळा आहे, पाहा धमाकेदार ट्रेलर
आयुष्यमान खुराणाला ( Ayushmann Khurrana ) मोठ्या पडद्यावर मिस करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, आयुष्यमानचा ‘अनेक’ नावाचा नवा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर ( Anek Trailer) रिलीज झाला आहे.
या चित्रपटात आयुष्मान पहिल्यांदा एका अंडर कव्हर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना एका मिशनवर नेण्यासाठी तो सज्ज आहे. ‘अनेक’ हा एक पॉलिटिकल अॅक्शन थ्रीलर सिनेमा आहे.
3 मिनिट 12 सेकंदाच्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आयुष्यमान जोशुआच्या भूमिकेत आहे. ज्याच्यावर नॉर्थ ईस्ट भागातील फुटिरवाद्यांना नियंत्रित करण्याची जबाबदारी सोपवली जाते. या भागात काही फुटिरवादी संघटना असतात. पण यापैकी जॉनसन या संघटनेनं हैदोस घातला असतो. या संघटनेला वेसण घालण्याचं चॅलेंज जोशुआ स्वीकारतो. ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना शत्रूसोबत लढताना, अॅक्शन करताना दिसत आहे. दमदार डायलॉग्सनी ट्रेलरमध्ये जीव ओतला आहे. ‘इंडिया इंडिया इंडिया... मैं इसी इंडिया की सुरक्षा के लिए काम करता हूं नॉर्थ ईस्ट में.. , असे अनेक संवाद ट्रेलरमध्ये आहेत.
या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केलं आहे. अनुभव सिन्हा यांनी याआधी थप्पड़, आर्टिकल 15, मुल्क यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत. आता त्यांच्या ‘अनेक’ या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. येत्या 27मे दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.