जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 21:55 IST2025-10-20T21:53:00+5:302025-10-20T21:55:34+5:30
माझं निधन झालं तर...; असरानी यांनी निधनापूर्वी कुटुंबाला सांगितली होती इच्छा. काय म्हणाले होते? चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक गोवर्धन असरानी (Govardhan Asrani) यांचं आज (२० ऑक्टोबर) रोजी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. असरानी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या कुटुंबाने त्यांची इच्छा पूर्ण केली. जाणून घ्या सविस्तर
असरानी यांच्यावर मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यंस्कार झाले. यावेळी केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. कुटुंबाने त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करत त्यांचे अंत्यसंस्कार अत्यंत खाजही पद्धतीने पार पाडले.
Veteran Hindi film actor Govardhan Asrani, fondly known as Asrani, passes away at the age of 84 after a prolonged illness. #Asranipic.twitter.com/1Exy8Unr6M
— All India Radio News (@airnewsalerts) October 20, 2025
असरानी यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते काही काळापासून आजारी होते. असरानी यांनी त्यांची पत्नी मंजू यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, त्यांचं निधन सार्वजनिकरित्या जाहीर न करता, अगदी शांतपणे अंत्यसंस्कार करावेत. त्यांच्या इच्छेनुसार, कुटुंबाने मीडियापासून दूर राहून कोणतीही सार्वजनिक घोषणा न करता अभिनेत्याचे अंतिम संस्कार पार पाडले.
मृत्यूच्या काही तास आधी दिल्या होत्या दिवाळीची शुभेच्छा
असरानी यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी निधन होण्यापूर्वी काही तास आधी इंस्टाग्रामवर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी असं होते. मागील काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. फुफ्फुसांच्या समस्येमुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या मृत्यूची पुष्टी केली.