Malaika-Arjun: ब्रेकअपच्या चर्चांना अर्जुनने दिला पूर्णविराम! मलायकाच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, “तुझ्या आयुष्यात...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 21:04 IST2023-08-26T21:02:37+5:302023-08-26T21:04:08+5:30

अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. मलायकाच्या पोस्टवर कमेंट करत अर्जुनने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

arjun kapoor commented on malaika arora post shut down break up rumors | Malaika-Arjun: ब्रेकअपच्या चर्चांना अर्जुनने दिला पूर्णविराम! मलायकाच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, “तुझ्या आयुष्यात...”

Malaika-Arjun: ब्रेकअपच्या चर्चांना अर्जुनने दिला पूर्णविराम! मलायकाच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, “तुझ्या आयुष्यात...”

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अर्जुन-मलायकाच्या नात्यात दुरावा आला असून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगली आहे. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानच अर्जुन आणि मलायकाने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. मलायकाने अर्जुनच्या कुटुंबीयांना अनफॉलो केल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. आता अर्जुनने मलायकाबरोबरच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानच मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. मलायकाने आंतरराष्ट्रीय श्वान दिनानिमित्त तिच्या पाळीव कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने “यापेक्षा चांगला सोबती मिळू शकत नाही. माझ्या सुपरस्टारबरोबर प्रत्येक दिवस साजरा करते”, असं कॅप्शन दिलं आहे. मलायकाच्या या पोस्टवर अर्जुनने कमेंट केली आहे. “तुझ्या आयुष्यातील खरा स्टार” अशी कमेंट अर्जुनने केली आहे. मलायकाच्या पोस्टवर कमेंट करत अर्जुनने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

शाहरुख खान अडचणीत? ‘मन्नत’बाहेरील पोलीस सुरक्षेत वाढ, समोर आलं मोठं कारण

बॉलिवूड अभिनेत्रीने खरेदी केलं सुशांत सिंह राजपूत राहत असलेलं घर, अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर रिकामी होता फ्लॅट

दरम्यान, अर्जुन कपूरचं नाव सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलाबरोबर जोडलं जात आहे.  ते दोघेही डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. यावर कुशा कपिलाने मौन सोडत प्रतिक्रिया दिली होती. अर्जुन कपूरला डेट करत असल्याच्या वृत्तांवर टिप्पणी करताना ती म्हणाली, “माझ्याबद्दल इतकं बकवास रोज वाचल्यानंतर, मला स्वतःचा एक फॉर्मेट परिचय करून द्यावा लागेल. मी नेहमीच माझ्याबद्दल मूर्ख गोष्टी पाहते. मी फक्त प्रार्थना करतो की माझ्या आईने हे सर्व वाचू नये. तिच्या सोशल लाइफला धक्का बसेल.”

Web Title: arjun kapoor commented on malaika arora post shut down break up rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.