ठरलं तर! मलायका- अर्जुन या दिवशी बांधणार लग्नगाठ; लग्नाची तारीख आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 16:01 IST2022-05-18T16:00:57+5:302022-05-18T16:01:21+5:30
Arjun kapoor and malaika arora: अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या जोडीच्या लग्नाविषयी दररोज चर्चा रंगत असतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत आहे.

ठरलं तर! मलायका- अर्जुन या दिवशी बांधणार लग्नगाठ; लग्नाची तारीख आली समोर
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नसराईचे वारे वाहात आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेक लोकप्रिय कलाकारांनी लग्नगाठ बांधून त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. यामध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या जोडीच्या लग्नाविषयी दररोज चर्चा रंगत असतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे ते लग्नाच्या बेडीत कधी अडकणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. परंतु, आता या जोडीच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
गेल्या चार वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत. अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायका अर्जुनला डेट करु लागली. विशेष म्हणजे या जोडीने जाहीरपणे त्यांचं नातं मान्य केलं आहे. त्यामुळे हे दोघं नेमकं कधी लग्न करणार हा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. यामध्येच आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मलायका आणि अर्जुन या वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर २०२२ पर्यंत लग्न करु शकतात. परंतु, अत्यंत साध्या पद्धतीने हे लग्न करण्याचा निर्णय या दोघांनी घेता असून रजिस्टर पद्धतीने हे लग्न होणार आहे. तसंच या सोहळ्यात अगदी जवळच्या मोजक्या मंडळींचा समावेश असणार आहे.
दरम्यान, मलायका- अर्जुनच्या लग्नातील गेस्टची लिस्ट तयार झाली आहे. त्यामुळे कपूर आणि अरोरा कुटुंबातील काही मोजकेच पाहुणे मंडळी या लग्नात उपस्थित राहणार आहेत. अर्जुन आणि मलायका या दोघांच्या वयात प्रचंड अंतर असल्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. मात्र, या दोघांनी वेळोवेळी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.