World Cup Final IND vs AUS: क्रिकेट प्रेमींचं लक्ष किंग कोहलीकडे, तर पतीला पाठिंबा देण्यासाठी अनुष्काही सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 15:55 IST2023-11-19T15:53:31+5:302023-11-19T15:55:28+5:30
सध्या भारताचा स्कोर पाहता क्रिकेटरसिक चिंतेत पडले आहेत.

World Cup Final IND vs AUS: क्रिकेट प्रेमींचं लक्ष किंग कोहलीकडे, तर पतीला पाठिंबा देण्यासाठी अनुष्काही सज्ज
ICC ODI World Cup Final IND vs AUS : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान भारताचे तीन गडी अगदी थोडक्यात बाद झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे तिघेही बाद झाल्याने आता सगळं लक्ष विराट कोहलीवर (Virat Kohli) आहे. विराटचा आतापर्यंतचा शानदार परफॉर्मन्स पाहता किंग कोहलीच आपल्याला वाचवू शकतो अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन येत आहेत. दरम्यान विराटला पाठिंबा देण्यासाठी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) स्टँडमधून त्याला चिअर करताना दिसत आहे.
सध्या भारताचा स्कोर पाहता क्रिकेटरसिक चिंतेत पडले आहेत. विराट कोहली आणि के एल राहुल फटकेबाजी करत आहेत. तर दोघांच्या लेडी लव्ह स्टँडमधून त्यांना पाठिंबा देत आहेत. अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे विराटवरच धावा करण्याचं प्रेशर असल्याने सर्वच त्याच्याकडे आशेने पाहत आहेत.
अनुष्काने सेमी फायनल मॅचमध्येही हजेरी लावून विराटसाठी चिअर केले होते. तेव्हा विराटने ५० वे शतक झळकावत सचिन तेंडुलकरचाही रेकॉर्ड मोडला होता. तो क्षण सर्वात आनंदाचा होता. आता फायनलमध्येही किंग कोहलीची जादू चालावी अशी चाहत्यांना आशा आहे.