"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:01 IST2026-04-10T11:01:11+5:302026-04-10T11:01:38+5:30
'धुरंधर'ची चर्चा सोडा, रणवीरने 'लुटेरा'वेळी केलं असं काही की..., अनुराग कश्यपने सांगितला किस्सा

"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
आज रणवीर सिंहची 'धुरंधर' सिनेमामुळे वाहवाह होत आहे. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम सिनेमा असल्याची प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत. सिनेमात रणवीर आणि अर्जुन रामपालने फाईट सीन्समध्ये एकमेकांना खरोखर घायाळ केलं होतं अशीही चर्चा झाली. दरम्यान अनुराग कश्यपने नुकतंच रणवीर सिंहचा 'लुटेरा' सिनेमातील किस्सा सांगितला. त्यामुळे रणवीरने पोटात स्टेपलर टोचून घेतलं होतं असं तो म्हणाला. नक्की काय आहे तो किस्सा?
अनुराग कश्यपने मिस मालिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "आपण 'धुरंधर'च्या गोष्टी ऐकतोय की कसं रणवीर आणि अर्जुनने एकमेकांना जखमी केलं. त्यांनी फाईट सीन खरा वाटावा म्हणून मेहत घेतली. सिनेमाने तर दमदार कमाई केली. पण रणवीर सिंहने याआधी 'लुटेरा' सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये त्याला गोली लागते तेव्हा ती वेदना खरी वाटावी म्हणून पोटात स्टेपलर टोचून घेतलं होतं. आम्हाला त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. सिनेमा धुरंधर इतका चालला नाही पण त्या माणसाचा दृढविश्वास होता. त्याने स्वत:ची वेदना कोणालाच दाखवली नाही. त्याला जेव्हा चालताही येत नव्हतं तेव्हा सर्वांना त्याच्या या प्रकाराबद्दल समजलं."
रणवीर सिंह सध्या 'धुरंधर'चं यश सेलिब्रेट करत आहे. जिकडे तिकडे सिनेमाचीच चर्चा आहे. सिनेमाने आतापर्यंत १३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरात सिनेमा १६०० कोटींच्या घरात पोहोचला आहे.
'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' दोन्ही सिनेमांनी इंडस्ट्रीत माईलस्टोन सेट केला आहे. सत्य घटनांवर आधारित या सिनेमाला अनेकांनी प्रोपगंडा म्हटलं मात्र कमाईच्या बाबतीत सिनेमाने इतरांचे रेकॉर्ड मोडले आहेत. धुरंधर : द रिव्हेंज मध्ये रणवीर सिंहशिवाय आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन असे अनेक कलाकार आहेत.