दोनदा लग्न केलं, पण बाप होण्याचं सुख पदरी पडलं नाही, कोटींचे आहे मालक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 14:13 IST2025-03-09T14:12:53+5:302025-03-09T14:13:24+5:30

मुलं व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यात अपयश आलं.

Anupam Kher Married Twice But Not Have Own Child | Kirron Kher | दोनदा लग्न केलं, पण बाप होण्याचं सुख पदरी पडलं नाही, कोटींचे आहे मालक!

दोनदा लग्न केलं, पण बाप होण्याचं सुख पदरी पडलं नाही, कोटींचे आहे मालक!

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची जास्त चर्चा झालेली आहे. असेच एक अभिनेते आहेत, ज्यांनी दोन लग्न केली, पण त्याच्या पदरी बाप होण्याचं सुख पडलं नाही. ते कोट्यवधींचे मालक आहेत. पण, त्यांना एक अपत्य नाही. वडिल होणं ही एक मोठी जबाबदारी आहे, पण हे सुख मिळालं नाही, याची सल त्यांना आजही आहे.

ते अभिनेते आहेत अनुपम खेर (Anupam Kher). ते भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेते आहेत. अनुपम खेर यांना आपण कधी गंभीर, कधी विनोदी तर कधी खलनायकी भूमिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.  ते मूळचे शिमलाचे आहे. करिअर घडवण्यासाठी मुंबईत आले आणि इथेच स्थायिक झाले. रिपोर्टनुसार अनुपम यांनी १९७९ मध्ये मधुमालती कपूरशी लग्न केलं. परंतु काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी किरण खेरशी (Kirron Kher) लग्न केलं,ज्यांना त्यांच्या पहिल्या पतीपासून सिकंदर हा मुलगा आहे. अनुपम खेर यांनी मुलासह त्यांना स्वीकारलं.  लग्नानंतर अनुपम यांनी सिकंदरला आपलं नावही दिलं. पण, त्यांना स्वत:चं मूल न झाल्याची नेहमीच (Anupam Kher Talks About Not Having Children ) खंत वाटते. 

किरण खेर आणि अनुपम खेर यांनी मुलं व्हावं यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यात अपयश आलं. शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये ते म्हणाले होते, "स्वत:चं मूल नाही याचा मला आधी काहीच फरक पडायचा नाही. पण, आता असं वाटतं की, मुलाला मोठं होताना पाहणं आनंददायी असतं. गेल्या ७-८ वर्षांपासून मला हे जाणवायला लागलंय. असं नाही की सिकंदरमुळ मला आनंद मिळत नाही, पण मी मुलाला मोठं होताना बघू शकलो नाही याचं वाईट वाटतं". अनुपम खेर यांची एकूण संपत्ती ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ते दरमहा सुमारे ३ कोटी रुपये कमवतात.


अनुपम खेर यांच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झाले तर, ते कंगना राणौत दिग्दर्शित आणि अभिनीत 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसले होते. 'इमर्जन्सी'मध्ये अनुपम खेर यांनी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारली होती.  या चित्रपटात १९७५ ते १९७७ या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात जाहीर केलेल्या ऐतिहासिक आणीबाणीचा काळ दाखवण्यात आला आहे. लवकरच ते प्रभासच्या 'फौजी' चित्रपटात दिसणार आहे. 

Web Title: Anupam Kher Married Twice But Not Have Own Child | Kirron Kher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.