जबर मानसिक धक्का अन् कोमात गेलेले 29 दिवस; 'त्या' अपघातानंतर उद्धवस्त झालं 'आशिकी गर्लचं करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 15:07 IST2023-10-02T15:05:28+5:302023-10-02T15:07:51+5:30
Anu aggarwal: अनु त्या काळी टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, एका अपघातानंतर तिचं सगळं आयुष्यच बदलून गेलं.

जबर मानसिक धक्का अन् कोमात गेलेले 29 दिवस; 'त्या' अपघातानंतर उद्धवस्त झालं 'आशिकी गर्लचं करिअर
'आशिकी गर्ल' म्हणून रातोरात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अनु अग्रवाल (anu aggarwal). या सिनेमाने अनुला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. इतकंच नाही तर आजही ती आशिकी गर्ल याच नावाने ओळखली जाते. पहिल्याच सिनेमातून तुफान लोकप्रियता मिळवणारी अनु त्या काळी टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, एका अपघातानंतर तिचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. या अपघातामुळे तिचं करिअर संपलं. एका मुलाखतीमध्ये तिने या अपघाताविषयी आणि तिच्या करिअरविषयी भाष्य केलं होतं.
१९९९ मध्ये अनुच्या कारचा अपघात झाला. हा अपघात इतका जबरदस्त होता की ज्यामुळे अनु २९ दिवस कोमात होती. जवळपास महिनाभर मृत्युशी झुंज दिल्यानंतर ती शारीरिकरित्या बरी झाली. मात्र, या अपघाताच परिणाम तिच्या मनावर खोलवर झाला होता. यातून तिला बाहेर पडायला बरीच वर्ष लागली. या अपघाताच्या २ वर्षानंतर अनुने सिनेसृष्टीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या अपघातानंतर अनुचं सगळं आयुष्य बदलून गेलं. आज ती ५३ वर्षांची झाली असून एकट्याने आयुष्य जगत आहे. सोबतच ती एक मेंटल हेल्थ फाऊंडेशन चालवते.