Box Office : भाईजानवर चाहते मेहरबान, दुसऱ्या दिवशी वाढली कमाई; ‘सूर्यवंशी’ सर्वांवर भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 15:10 IST2021-11-28T15:02:24+5:302021-11-28T15:10:13+5:30
Antim Box Office Collection Day 2 : अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’नं बक्कळ गल्ला जमवला. त्यामुळे भाईजानचा सिनेमा किती कमाई करतो, हे जाणून घेण्यास सर्वच उत्सुक होते. पण...

Box Office : भाईजानवर चाहते मेहरबान, दुसऱ्या दिवशी वाढली कमाई; ‘सूर्यवंशी’ सर्वांवर भारी
आयुष शर्मा (Aayush Sharma) व सलमान खान (Salman Khan) यांचा ‘अंतिम - द फायनल ट्रूथ’ हा सिनेमा (Antim Box Office Collection Day 2) रिलीज झाला आणि सर्वाचं लक्ष बॉक्स ऑफिसवरच्या आकड्यांवर केंद्रीत झालं. अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’नं बक्कळ गल्ला जमवला. त्यामुळे भाईजानचा सिनेमा किती कमाई करतो, हे जाणून घेण्यास सर्वच उत्सुक होते. पण पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सलमानच्या सिनेमानं केवळ 4.75 कोटींचा बिझनेस केला. अर्थात काल शनिवारी चित्रपटाच्या कमाईत 15 टक्के वाढ झालेली दिसली. शनिवारी चित्रपटाने 5.50 कोटींचा बिझनेस केला. दोन दिवसांत चित्रपटानं एकूण 10.25 कोटींची कमाई केली.
‘अंतिम - द फायनल ट्रूथ’मध्ये आयुष शर्मा मुख्य भूमिकेत आहे तर सलमान सपोर्टिंग रोलमध्ये. तरीही हा भाईजानचा सिनेमा म्हणूनच ओळखला जातोय. महाराष्ट्रात सिंगल स्क्रिन्स थिएटरमध्ये चित्रपट चांगली कमाई करतोय. शनिवारी दिल्ली व गुजरातमध्येही कमाईत वाढ झालेली पाहायला मिळतेय.
‘सूर्यवंशी’ सूसाट
‘सूर्यवंशी’ गेल्या 5 नोव्हेंबरला रिलीज झाला होता. आत्तापर्यंत चित्रपटाने 186.61 कोटींचा बिझनेस केला आहे. रिलीजच्या चौथ्या शनिवारी ‘सूर्यवंशी’ने 1.5 कोटींचा बिझनेस केला. या आठवड्यापर्यंत हा चित्रपट 190 कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज आहे. तूर्तास ‘सूर्यवंशी’ 200 कोटींचा टप्पा गाठेल, अशी शक्यता कमी आहे. जाणकारांच्या मते, चित्रपट 195 कोटींपर्यंत मजल मारू शकतो.
‘सत्यमेव जयते 2’ला मोठा फटका
जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ला ‘अंतिम - द फायनल ट्रूथ’मुळे जोरदार फटका बसला आहे. चित्रपटाची कमाई अर्ध्यावर आली आहे.