अंकिता लोखंडेच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन?; lock upp मध्ये केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 17:10 IST2022-04-03T17:10:22+5:302022-04-03T17:10:52+5:30
Ankita lokhande: काही महिन्यांपूर्वीच अंकिताने विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता अंकिता लवकर आई होणार आहे.

अंकिता लोखंडेच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन?; lock upp मध्ये केला खुलासा
'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. सध्या अंकिता तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत येत आहे. यामध्येच आता अंकिताने एक मोठा खुलासा केला आहे. काही महिन्यांपूर्वीच अंकिताने विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता अंकिता लवकर आई होणार आहे. अलिकडेच तिने कंगना रणौतच्या लॉकअप या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने हा खुलासा केला.
सध्या सोशल मीडियावर अंकिताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता प्रेग्नंट असल्याचं सांगते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता तिच्या 'पवित्रा रिश्ता 2' या मालिकेच्या प्रमोशनसाठी लॉक अपच्या मंच्यावर हजेरी लावते. यावेळी "लॉक अपच्या रूल नुसार, तुला तुझं एखादं गुपित सांगावं लागेल", असं कंगना म्हणते. त्यावर, "मी प्रेग्नंट आहे.. आणि ही गोष्ट अजूनपर्यंत विकीलादेखील माहित नाही", असं अंकिता सांगते.
दरम्यान, अंकिताने हा खुलासा केल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. मात्र, अंकिता खरंच प्रेग्नंट आहे की केवळ मस्करीत ती म्हणाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या वाक्यामागील नेमकं सत्य काय हे अंकिताच सांगू शकेल.