आता भोजपुरीतही येणार Animal, 'हा' अभिनेता साकारणार रणबीर कपूरची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:45 IST2023-12-11T12:44:56+5:302023-12-11T12:45:45+5:30

मनोरंजनविश्वात हिंदी, मराठी, साऊथसोबतच भोजपुरी फिल्म्सचाही वेगळा चाहतावर्ग आहे.

Animal movie bhojpuri remake Khesari Lal Yadav may play Ranbir Kapoor s role | आता भोजपुरीतही येणार Animal, 'हा' अभिनेता साकारणार रणबीर कपूरची भूमिका?

आता भोजपुरीतही येणार Animal, 'हा' अभिनेता साकारणार रणबीर कपूरची भूमिका?

मनोरंजनविश्वात हिंदी, मराठी, साऊथसोबतच भोजपुरी फिल्म्सचाही वेगळा चाहतावर्ग आहे. अनेक सुपरहिट हिंदी आणि साऊथ चित्रपटांचे भोजपुरी रिमेक बनले आहेत. आता यामध्ये रणबीर कपूरच्या Animal सिनेमाचाही समावेश झाला आहे. भोजपुरी निर्माते  सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या रणबीर कपूरच्या Animal सिनेमाचा रिमेक बनवण्याच्या तयारित आहेत. तसंच यामध्ये कोण मुख्य अभिनेता असेल त्याचंही नाव समोर आलं आहे. 

भोजपुरीमध्ये बनवण्यात येणाऱ्या सिनेमात खेसारी लाल यादव मुख्य भूमिका साकारु शकतो. रणबीर कपूरने साकारलेल्या भूमिकेसाठी त्याच्या नावाची चर्चा आहे. सध्या तो सिनेमासाठी तयारी करत आहे आणि हा सिनेमा Animal चीच कॉपी आहे. सिनेमाचा प्रत्येक सीन, स्टोरी लाईन जशीच्या तशी कॉपी करण्यात येणार आहे. याबद्दल साऊथ निर्मात्यांसोबत चर्चा सुरु आहे.

कधी सुरु होणार भोजपुरी Animal ची शूटिंग

माध्यम रिपोर्ट्सनुसार, अभिनेता खेसारी लाल यादव जानेवारी महिन्यात शूटिंगला सुरुवात करणार आहे. यासाठी वाराणसीजवळील काही ठिकाणांवर शूट होणार आहे. यामध्ये साऊथ आणि हिंदी सिनेमातील काही कलाकारही दिसू शकतात. 

Animal ने आतापर्यंत वर्ल्डवाईड तब्बल 700 कोटींचा व्यवसाय केला आहे. रणबीर कपूरचा आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा आहे.  सिनेमात रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: Animal movie bhojpuri remake Khesari Lal Yadav may play Ranbir Kapoor s role