बॉक्स ऑफिसवर होणार जबरदस्त टक्कर, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘अॅनिमल’ने मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 12:04 IST2023-11-26T12:00:47+5:302023-11-26T12:04:13+5:30
‘अॅनिमल’ आणि 'सॅम बहादुर' या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स ऑफिसवर होणार जबरदस्त टक्कर, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘अॅनिमल’ने मारली बाजी
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमासह विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हा बहुचर्चित सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज आधीच दोन्ही सिनेमांनी चांगलीच कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये जबरदस्त टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे.
‘अॅनिमल’ आणि 'सॅम बहादुर' या दोन्ही चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून यात रणबीरच्या ‘अॅनिमल’ने बाजी मारल्याचं मीडिया रीपोर्टवरुन स्पष्ट होत आहे. सॅकनिल्कनुसार, 'सॅम बहादुर'चे चित्रपटाची 12,876 तिकिटे विकली गेली आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाची आतापर्यंतची कमाई 44.71 लाख रुपये झाली आहे. मात्र, रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ने ॲडव्हान्स बुकिंगद्वारे 2 कोटींहून अधिक कमाई केली.
विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं असून तो 1 डिसेंबरलाच प्रदर्शित होत आहे. फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्यावर बेतलेला हा बायोपिक आहे. तर ‘अॅनिमल’ देखील 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅनिमल’चे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आमने-सामने येणार आहे. या दोन्ही सिनेमांची सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.