माधुरीसोबत पुन्हा एकदा रोमांस करणार अनिल कपूर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 11:12 AM2017-11-01T11:12:24+5:302017-11-01T17:28:41+5:30

माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखूबर आहे. फिल्मकार इंदर कुमार आपला नवा चित्रपट टोटल धमालबाबत माधुरी ...

Anil Kapoor to romance again with Madhuri | माधुरीसोबत पुन्हा एकदा रोमांस करणार अनिल कपूर ?

माधुरीसोबत पुन्हा एकदा रोमांस करणार अनिल कपूर ?

googlenewsNext
धुरी दीक्षित आणि अनिल कपूरच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखूबर आहे. फिल्मकार इंदर कुमार आपला नवा चित्रपट टोटल धमालबाबत माधुरी दीक्षितशी बोलतोय. सगळं काही ठरल्याप्रमाणे झाले तर या चित्रपटात माधुरीच्या अपोझिट अनिल कपूर दिसणार आहे.  

एक एंटरटेनमेंट वेबसाईटच्या रिपोर्टनुसार ' इंदर कुमारने काही महिन्यांपूर्वी आपल्या नव्या चित्रपटासंदर्भात माधुरीशी बातचित केली आहे. ज्या संदर्भातील चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जर टोटल धमालसाठी माधुरीने हां म्हटले तर जवळपास 25 वर्षानंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. माधुरी आणि अनिल कपूरच्या जोडीने आतापर्यंत खेल, बेटा, तेजाब सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहे.   

टोटल धमालमध्ये माधुरी आणि अनिल कपूरसह, अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. रितेश देशमुख आणि अर्शद वारसीचे नाव या चित्रपटासाठूी आधीचे फायनल करण्यात आले होते. आता यात अनिल कपूर, माधुरी आणि अजयच्या नावाने एंट्री घेतली आहे.  

इंदर कुमार आणि अनिल कपूरच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. फक्त या जोडीचा शेवटचा चित्रपट रिश्ते बॉक्स ऑफिसवर आपटला होता. आता प्रेक्षकांना टोटल धमाल या चित्रपटला कसा प्रतिसाद देतात हा चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल. सध्या अजय देवगणचा गोलमाल अगेन चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड प्रस्थापित करतो आहे तर अनिल कपूर आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनिल कपूरसोबतच राजकुमार राव आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर यांची जोडी जवळपास दोन दशकानंतर एकत्र दिसणार आहे. याआधी दोघे 2000मध्ये आलेल्या हमारा दिल आपके पास है आणि 1999 साली सुपरहिट झालेल्या ताल चित्रपटात दिसले होते. फन्ने खान चित्रपटाची निर्मिती राकेश ओम प्रकाश मेहरा करणार आहेत. अतुल मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. पुढच्या वर्षी 13 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Anil Kapoor to romance again with Madhuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.