अनिल कपूर करतोय गंभीर आजाराचा सामना? उपचारांसाठी जर्मनीत गेल्यावर शेअर केला व्हिडीओ, चाहत्यांमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 22:53 IST2021-11-26T22:51:53+5:302021-11-26T22:53:14+5:30
Anil Kapoor News: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर सध्या जर्मनीमध्ये आहे. तसेच त्याने या टूरमधून आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून अनिल कपूरने हा त्याचा जर्मनीमधील उपचारांचा शेवटचा दिवस आहे. तसेच डॉक्टरांना भेटण्यासाठी जात आहे, असे सांगितले आहे.

अनिल कपूर करतोय गंभीर आजाराचा सामना? उपचारांसाठी जर्मनीत गेल्यावर शेअर केला व्हिडीओ, चाहत्यांमध्ये खळबळ
नवी दिल्ली - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर सध्या जर्मनीमध्ये आहे. तसेच त्याने या टूरमधून आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून अनिल कपूरने हा त्याचा जर्मनीमधील उपचारांचा शेवटचा दिवस आहे. तसेच डॉक्टरांना भेटण्यासाठी जात आहे, असे सांगितले आहे.
व्हिडीओमध्ये अनिल कपूर काळ्या रंगाचा कोट परिधान केलेला दिसत आहे. त्याला ब्लॅक कॅप आणि ब्लॅक ट्राऊझरसह टीमअप केले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अनिल कपूरने लिहिले आहे की, बर्फावर एक परफेक्ट वॉक, जर्मनीमध्ये लास्ट डे. मी आपल्या लास्ट ट्रिटमेंटसाठी डॉ. Mullerशी भेटण्यासाठी जात आहे. त्यांचे आणि त्यांच्या मेडिकल टचचे मी आभार मानतो.
सुंदर हिमवृष्टीदरम्यान, अनिल कपूर जर्मनीच्या रस्त्यांवर वॉक करताना दिसत आहे. मात्र अनिल कपूरकडून उपचारांसाठी जर्मनीमध्ये गेल्याचा खुलासा केला गेल्याने त्याच्या फॅन्सना धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे उपचारांसाठी परदेशात जात असतात. त्यामुळे अनिल कपूर परदेशात गेल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
अनिल कपूरने उपचारांसाठी जर्मनीत गेल्याचे सांगितले असले तरी तो कुठल्या आजारावर उपचार करण्यासाठी गेला आहे, हे त्याने सांगितलेले नाही. त्यामुळे फॅन्स मेसेज करून तो कोणत्या आजारावर उपचार घेण्यासाठी परदेशात गेला आहे, अशी विचारणा करत आहेत. मात्र त्यालाही अनिल कपूरकडून काहीही उत्तर मिळालेले नाही. मात्र आता अनिल कपूर याबाबच कधीपर्यंत माहिती देतो हे पाहावे लागेल. मात्र तोपर्यंत त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.