अनंत अंबानींनी मित्रांना गिफ्ट केलं महागडं घड्याळ; शाहरुख, रणवीर सिंहनेही केलं फ्लॉन्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 09:54 IST2024-07-14T09:51:39+5:302024-07-14T09:54:00+5:30
अनंत अंबानींनी एकूण 25 घड्याळच दिले. कारण काय?

अनंत अंबानींनी मित्रांना गिफ्ट केलं महागडं घड्याळ; शाहरुख, रणवीर सिंहनेही केलं फ्लॉन्ट
अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटचं लग्न गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. आधी प्री वेडिंग सोहळ्यांची चर्चा होती. १२ जुलै रोजी दोघंही लग्नबंधनात अडकले. अनंत अंबानींनी लग्नात आपल्या जवळच्या मित्रांना तसंच बॉलिवूडच्या हिरोंना एक महागडं घड्याळ रिटर्न गिफ्टमध्ये दिलं आहे. याची झलक रणवीर सिंह (Ranveer Singh), शाहरुखने (Shahrukh Khan) दाखवली. एका घडाळ्याची किंमत किती माहितीये का?
अनंत अंबानींच्या वरातीत अनेक बॉलिवूड अभिनेते सहभागी झाले होते. मध्येच नाचत ते घोडा अडवत होते. तेव्हा अनंतने प्रत्येकाला शगुन म्हणून सुंदर घड्याळ गिफ्ट केलं. यामध्ये त्याचे जवळचे मित्र आणि सेलिब्रिटी सहभागी होते. या रोज गोल्ड डायल घड्याळ्याची कोट्यवधींची किंमत आहे. Audemars Piguet ब्रँडचे हे घड्याळ आहे. 18k रोज गोल्डने बनलेल्या या घड्याळ्यावर सफायर क्रिस्टलचे डार्क ब्लू डायल आहे. हे लिमिटेड एडिशन असल्यामुळे अनंतने एकूण 25 घड्याळ गिफ्ट केले. या एका घड्याळाची मार्केटमधली किंमत तब्बल 2 कोटी रुपये आहे.
शाहरुख खान, रणवीर सिंह, शिखर पहाडियासोबतच इतर सेलिब्रिटी घड्याळ फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. हार्दिक पांड्याही या वरातीत बेभान होऊन नाचताना दिसला होता. वरातीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नात एकूण 5 हजार कोटींचा खर्च झाल्याचीही चर्चा आहे. हा खर्च अंबानींच्या एकूण संपत्तीपैकी केवळ 0.5 टक्केच आहे. लग्नात एवढा खर्च करुनही त्यांच्या संपत्तीत आणखी वाढच झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये एक टक्क्याने वाढ झाली आहे.