अभिषेक बच्चनने वडील अमिताभ यांना दिले खास गिफ्ट! तुम्हीही एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 14:29 IST2024-05-15T13:37:49+5:302024-05-15T14:29:53+5:30
नुकतेच अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील मजबूत बॉन्डिंगची झलक पाहायला मिळत आहे.

अभिषेक बच्चनने वडील अमिताभ यांना दिले खास गिफ्ट! तुम्हीही एकदा पाहाच
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांच्यासह संपूर्ण बच्चन कुटुंबीयचं नेहमी चर्चेत असतं. बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक आहे. या कुटुंबातील जवळपास प्रत्येकजण चित्रपटसृष्टीशी जोडला आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचा लेक अभिषेक बच्चनेही बॉलिवूडनगरीत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. बच्चन कुटुंबातील सदस्यांचं एकमेंकावर खूप प्रेम आहे. नुकतेच अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील मजबूत बॉन्डिंगची झलक पाहायला मिळत आहे.
अभिषेक बच्चनने वडिल अमिताभ यांना एक गॅझेट गिफ्ट दिलं आहे. याची माहिती खुद्द अमिताभ यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये त्यांनी Apple Vision Pro परिधान केलेला दिसत आहे. त्यांनी हे गॅझेट पहिल्यांदाच वापरून पाहिलं असून त्यांना ते प्रचंड आवडलं. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, ' Wooaaaaah...Apple Vision Pro घातल्यानंतर तुमचा दृष्टिकोन पूर्वीसारखा राहणार नाही. अभिषेकने मला याची ओळख करून दिली आहे'.
मीडिया रिपोर्टनुसार या गॅझेटची किंमत सुमारे 2.88 लाख रुपये आहे. अमिताभ यांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनसोबत 'गणपत' या ॲक्शनपटात शेवटचं काम केलं होतं. तर लवकरच ते 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्यासह अनेक कलाकार आहेत.