पाहताचक्षणी जया भादुरीच्या प्रेमात पडले होते अमिताभ बच्चन, फिल्मी आहे दोघांची लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 09:57 IST2026-02-17T09:56:41+5:302026-02-17T09:57:29+5:30
Amitabh bachchan: ७० चं दशक अमिताभ आणि जया यांच्यासाठी खास होतं. कारण, याच काळात ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

पाहताचक्षणी जया भादुरीच्या प्रेमात पडले होते अमिताभ बच्चन, फिल्मी आहे दोघांची लव्हस्टोरी
बॉलिवू़डचा 'बादशहा', 'शहेनशहा', 'बिग बी' अशा एक ना अनेक नावाने ओळखला जाणारा दिग्गज अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan). गेल्या कित्येक वर्षांपासून अमिताभ इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांच्या करिअरविषयी आणि वैयक्तिक आयुष्याविषयी चाहत्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असतात. बिग बींचे सिनेमा जितके चर्चिले गेले तितकीच त्यांची लव्हलाइफही चर्चेत राहिली आहे. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या लव्हस्टोरी बरेच जण ऐकून आहेत. मात्र, आज आपण अमिताभ आणि जया भादुरी (jaya bachchan) यांची लव्हस्टोरी जाणून घेऊयात.
७० चं दशक अमिताभ आणि जया यांच्यासाठी खास होतं. कारण, याच काळात ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. बिग बी आणि जया यांची लव्हस्टोरी कोणत्या सिनेमापेक्षा कमी नाही. कारण, जया यांना पाहताच अमिताभ त्यांच्या प्रेमात पडले होते.
जया आणि अमिताभ यांची पहिली भेट
प्रसिद्ध चित्रपट निर्माते के. अब्बास यांच्यासोबत अमिताभ बच्चन पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेले होते. यावेळी जया भादुरी सुद्धा तिथे आल्या होत्या. अमिताभ यांची पर्सनालिटी पाहून जया इंप्रेस झाल्या होत्या. मात्र, या पहिल्या भेटीत त्यांचं फारसं बोलणं झालं नाही. त्या काळात अमिताभ बच्चन यांचा करिअरमध्ये स्ट्रगल सुरु होता. तर, जया भादुरी यांचा इंडस्ट्रीमध्ये चांगलाच जम बसला होता. त्या सुपरस्टार होत्या.
पाहताचक्षणी जयाच्या प्रेमात पडले बिग बी
एका मासिकाच्या मुखपृष्ठावर जया बच्चन यांचा कव्हर फोटो छापून आला होता. हा फोटो पाहिल्यावर बिग बी पाहताच क्षणी जया यांच्या प्रेमात पडले. कारण, अमिताभ यांना त्यांच्या पत्नीमध्ये जे गुण हवे होते ते जया यांच्यात होते. मात्र, तरीदेखील बिग बींनी त्यांचं प्रेम जया यांच्यासमोर व्यक्त केलं नव्हतं.
अन् सुरु झाली जया-अमिताभची लव्हस्टोरी
ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'गुड्डी' या सिनेमाच्या सेटवर जय भादुरी आणि अमिताभ यांची पुन्हा भेट झाली. या सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाच्या सेटवरच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. त्यांच्या लव्हस्टोरीमध्ये अनेक चढउतारही आले. मात्र, ३ जून १९७३ रोजी या जोडीने लग्नगाठ बांधली.