अमिताभ बच्चन आणि आमिर खान दिसणार एकाच चित्रपटात ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2017 01:10 PM2017-03-15T13:10:57+5:302017-03-15T18:40:57+5:30

 मात्र याबाबत अधिकृत्यरित्या चित्रपटाच्या टीमकडून कोणतीच माहिती आलेली नाही, यश राज बॅनरखाली हा चित्रपट तयार होणार आहे.  याचित्रपटात आमिर ...

Amitabh Bachchan and Aamir Khan to appear in the same movie? | अमिताभ बच्चन आणि आमिर खान दिसणार एकाच चित्रपटात ?

अमिताभ बच्चन आणि आमिर खान दिसणार एकाच चित्रपटात ?

googlenewsNext
 
ात्र याबाबत अधिकृत्यरित्या चित्रपटाच्या टीमकडून कोणतीच माहिती आलेली नाही, यश राज बॅनरखाली हा चित्रपट तयार होणार आहे.  याचित्रपटात आमिर आणि अमिताभ बाप लेकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचेही समजते आहे. आमिर खान मुलाच्या भूमिकेत तर अमिताभ बच्चन आमिरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील. मात्र याबाबत अजून काहीही फायनल झालेले नाही. तसेच या चित्रपटात फातिमा सना शेख. श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नाव रेसमध्ये आहेत. पण यासगळ्यात  फातिमाचे नाव सगळ्यात पुढे असल्याचे कळते आहे. या अॅवॉर्ड सोहळ्या दरम्यान फातिमा म्हणाली मला याचित्रपटाचा हिस्सा बनायला नक्कीच आवडले. मात्र अजून तरी मी या चित्रपटाचा भाग बनलेली नाही. 

नुकतेचा आमिर खानचा सरदारच्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तो लूक आमिरच्या या चित्रपटातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र आमिरच्या नातेवाईकांकडून त्यांने हा लूक कुटुंबिक सोहळ्यासाठी परिधान केला असल्याचे सांगण्यात आले. आमिरच्या ज्या सरदारवाल्या लूकला घेऊन एवढी चर्चा होतेय तो सरदारवाला लूक आमिरचा ठग्स ऑफ हिंदुस्तानमधला नाही आहे. कौटुंबीक कार्यक्रमादरम्यान त्याने हा खास लूकमध्ये होता. आमिर खान मे मध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरु करणार आहे. याचित्रपटासाठी तो विशेष मेहनत घेत असल्याचे समजते आहे. दंगलमध्ये हट्टे-कट्टे दिसलेला आमिर या चित्रपटात बारिक दिसणार नाही.  ठग्स ऑफ हिंदुस्तान 2018मध्ये दिवाळीच्या दरम्यान रिलीज करण्यात येणार असल्याचे कळतेय. आमिर आणि आमिताभ बच्चन यांचे फॅन्स दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्यास खूपच उत्सुक आहेत.  

Web Title: Amitabh Bachchan and Aamir Khan to appear in the same movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.