अक्षय खन्नासोबत अमिषा पटेलने केलेला 'हमराज'; आता अभिनेत्याबद्दल म्हणाली, "तो तेव्हाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:59 IST2025-12-15T15:35:23+5:302025-12-15T15:59:31+5:30

२००२ साली आलेल्या 'हमराज'मध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत होता तर अमिषा पटेल मुख्य नायिका होती.

amisha patel says akshaye khanna blown away the nation with his performance both worked in humraaz | अक्षय खन्नासोबत अमिषा पटेलने केलेला 'हमराज'; आता अभिनेत्याबद्दल म्हणाली, "तो तेव्हाही..."

अक्षय खन्नासोबत अमिषा पटेलने केलेला 'हमराज'; आता अभिनेत्याबद्दल म्हणाली, "तो तेव्हाही..."

बॉलिवूडमध्येअक्षय खन्नाचं वारं जोरात आहे. 'दृश्यम ३'नंतर 'छावा' आणि आता 'धुरंधर'मधून त्याने कमालच केली आहे. आपल्या अभिनयाने त्याने सर्वांना त्याच्याबद्दल चर्चा करायला भाग पाडलं आहे. अक्षय खन्ना हा खरंतर ९०-२००० काळातला अभिनेता आहे. त्याचे 'ताल','दिल चाहता है','हमराज' असे सिनेमे गाजले आहेत. २००२ साली आलेल्या 'हमराज'मध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत होता तर अमिषा पटेल मुख्य नायिका होती. अक्षय खन्नाच्या या यशाबद्दल आता नुकतंच तिने प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर सध्या सगळीकडे अक्षय खन्नाचीच वाहवाही होत आहे. एका चाहत्याने ट्विटरवर 'हमराज'चा फोटो शेअर केला आहे.  ज्यामध्ये अक्षय खन्ना, अमिषा पटेल दिसत आहेत. चाहत्याने लिहिले, "अक्षय खन्नाने त्या वर्षी हमराजमधून सर्वांना चकित केलं होतं. तो बेस्ट होता."

अमिषा पटेलने हे ट्वीट रिव्टीट करत लिहिले,'तो तेव्हाही ग्रेट होता आणि आजही ग्रेटच आहे. हा अक्षय खन्ना आहे...अक्षु असं मी त्याला प्रेमाने बोलते. अतिशय नम्र आणि ना कशाचा गर्व...लंडनमध्ये हमराज प्रमोशनच्या वेळी माझ्या चुलत भावंडांसोबत डिनर करतानाचा फोटो. अक्षयने अभिनयाने अख्ख्या देशाला त्याच्या प्रेमात पाडलंय आणि याची त्याला जाणीवही नसेल असं मला वाटतं."

'हमराज' अक्षय आणि अमिषाच्या संपूर्ण करिअरमधला सर्वात सुपरहिट सिनेमा होता.  यातील प्रत्येक गाणीही गाजली होती. तसंच त्यातही अक्षयने केलेला डान्स व्हायरल झाला होता

Web Title : अमीषा पटेल ने अक्षय खन्ना के 'हमराज़' अभिनय की प्रशंसा की।

Web Summary : अमीषा पटेल ने 'हमराज़' में अक्षय खन्ना के अभिनय की सराहना करते हुए उनकी निरंतर महानता और विनम्रता का उल्लेख किया। उन्होंने फिल्म के प्रचार के दौरान के समय को याद करते हुए उनकी प्रतिभा और सहज स्वभाव की प्रशंसा की।

Web Title : Ameesha Patel praises Akshay Khanna's 'Humraaz' performance then and now.

Web Summary : Ameesha Patel lauded Akshay Khanna's performance in 'Humraaz,' noting his consistent greatness and humility. She fondly recalled their time during the film's promotion, praising his talent and down-to-earth nature.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.