"गदर 2 गटारात जाणार होता", अमिषा पटेलचा खुलासा; दिग्दर्शकावर लावले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 17:27 IST2024-06-14T17:26:40+5:302024-06-14T17:27:22+5:30

'गदर 2' मध्ये मी आणि सनीने बरेच बदल केले कारण दिग्दर्शकाचा...

Amisha Patel reveals Gadar 2 was going down the drain allegations made against the director | "गदर 2 गटारात जाणार होता", अमिषा पटेलचा खुलासा; दिग्दर्शकावर लावले आरोप

"गदर 2 गटारात जाणार होता", अमिषा पटेलचा खुलासा; दिग्दर्शकावर लावले आरोप

सनी देओल(Sunny Deol)  आणि अमिषा पटेल (Amisha Patel) यांचा २००० साली आलेला 'गदर' सिनेमा ऐतिहासिक ठरला. नंतर २३ वर्षांनी 'गदर 2' रिलीज झाला. सिनेमाकडून लोकांना खूप अपेक्षा होती. रिलीजनंतर सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. मात्र काही प्रेक्षकांनी पाठही फिरवली. आता नुकतंच अभिनेत्री अमिषाने खुलासा केला की 'गदर 2' गटारात जाणार होता. सोबतच तिने दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर बरेच आरोप केले.

एका मुलाखतीत अमिषा पटेल म्हणाली, "अनिल शर्मा यांचा छुपा अजेंडा होता. मी आणि सनीने फिल्म बनत असताना बऱ्याच सुधारणा केल्या. आम्ही बरीच एडिटिंग आणि रिशूटिंगही केलं. यामुळे आमच्यात आणि दिग्दर्शकात थोडे वाद झाले. अनिल शर्मा सिनेमाला ज्या दिशेने नेत होते त्यात आम्ही खूश नव्हतो."

ती पुढे म्हणाली, "मी बिझनेस पार्टनर कुणाल गूमरला याचं श्रेय देईन. त्याने गदर 2 ला योग्य ट्रॅकवर आणले. त्यानेच सनीला सावध केलं की सिनेमा चुकीचा बनत आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही अॅक्शन शेड्युलसाठी जाल तेव्हा सगळं ठीक करा."

गदर 3 बाबत अमिषा म्हणाली, "मी सिनेमाचा भाग असेन की नाही हे माहित नाही.  सकीना आणि तारा सिंगला व्यवस्थित स्क्रीन टायमिंग दिलं जावं हीच माझी अट आहे. तसंच गदर 2 ची गोष्ट अशा वळणावर संपली जिथे माझ्या ऑनस्क्रीन मुलाचं लग्न होऊ शकतं पण मला सध्या सासूची भूमिका करायची नाही."

Web Title: Amisha Patel reveals Gadar 2 was going down the drain allegations made against the director