विक्रम भट्टला डेट करणं अमिषाला पडलं महागात;५ वर्षात संपलं नातं अन् करिअरवर झाला परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 15:27 IST2024-06-09T15:27:16+5:302024-06-09T15:27:51+5:30
Ameesha patel: अभिनयासह बोल्डनेसमुळे चर्चेत येणाऱ्या अमिषाचं नाव अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत जोडलं गेलं. यात प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना ती एकेकाळी डेट करत होती.जवळपास ५ वर्ष अमिषा आणि विक्रम यांनी एकमेकांना डेट केलं. मात्र, त्यांचं नात लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

विक्रम भट्टला डेट करणं अमिषाला पडलं महागात;५ वर्षात संपलं नातं अन् करिअरवर झाला परिणाम
'कहो ना प्यार है', 'गदर', यांसारख्या सुपरहिट सिनेमातून इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल (Ameesha Patel). नुकतीच ती 'गदर 2' या सिनेमात झळकली. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या सिनेमासोबत तिच्या पर्सनल आयुष्याचीही चर्चा रंगली आहे. अमिषाचं प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चेत आलं त्याच्यापेक्षा कैकपटीने तिचं पर्सनल आयुष्यात चर्चेत राहिलं. एकेकाळी अमिषा एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला डेट करत होती. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यामुळे हा दिग्दर्शक नेमका कोण होता? त्यांचा ब्रेकअप का झाला? याविषयी सध्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
अभिनयासह बोल्डनेसमुळे चर्चेत येणाऱ्या अमिषाचं नाव अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत जोडलं गेलं. यात प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना ती एकेकाळी डेट करत होती.जवळपास ५ वर्ष अमिषा आणि विक्रम यांनी एकमेकांना डेट केलं. मात्र, त्यांचं नात लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. एका मुलाखतमध्ये अमिषाने त्यांच्या ब्रेकअपविषयी भाष्य केलं होतं.विशेष म्हणजे या रिलेशनचा फटका आपल्या करिअरलादेखील बसल्याचं तिने या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.
"इंडस्ट्रीमध्ये प्रामाणिकपणासा जागा नाही. पण मी मात्र माझा प्रामाणिकपणा कधीच सोडला नाही. मी कायम भावनिकरित्या माझे निर्णय घेत आले. कधीच माझा स्वार्थ पाहिला नाही. माझे दोन रिलेशनशीप होते. त्याच कारणामुळे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट उद्धवस्त झाली. त्यामुळेच गेल्या १२-१३ वर्षांपासून मी सिंगल आहे. मी आनंदाने जगतीये त्यामुळे मला आता काहीही नकोय. इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही सिंगल असण्याचा दर्जा कायम ठेवला तर तो तुमच्यासाठीच फायद्याचा ठरतो", असं अमिषा म्हणाली.
दरम्यान, अमिषा आणि विक्रम भट्ट यांनी त्यांचं ५ वर्षांचं नातं संपवलं आणि २००८ मध्ये ते विभक्त झाले. अमिषाने वयाची ४५ वर्ष उलटली आहेत. मात्र, अद्यापही ती अविवाहित आहे. अमिषा कलाविश्वात सक्रीय असून बऱ्याच वर्षांनंतर तिने 'गदर 2' या सिनेमातून कमबॅक केलं आहे.