'गदर 2' चा अमिषा पटेलने स्पॉयलरच सांगून टाकला, चाहते म्हणाले, 'आता कोण बघणार...?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 17:18 IST2023-06-30T17:13:10+5:302023-06-30T17:18:25+5:30
'गदर २' मधला एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'गदर 2' चा अमिषा पटेलने स्पॉयलरच सांगून टाकला, चाहते म्हणाले, 'आता कोण बघणार...?'
सध्या 'गदर 2' (Gadar 2) सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तारा सिंगचा पुन्हा एकदा अॅक्शन अवतार दिसणार आहे. गदर मध्ये हँडपंप उचलणारा तारा सिंग आता 'गदर २' मध्ये बैलगाडीचं चाक उचलताना दिसणार आहे. देशभक्ती, प्रेमकहाणीने भरलेल्या या सिनेमातही तारा सिंग आणि सकीनाची प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. पण नुकतंच अमिषाने (Amisha Patel) सिनेमातील एक स्पॉयलर उघड केला ज्यामुळे आता चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
'गदर २' मधला एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये सनी देओल रडत आहे तर समोर एका महिलेचा मृतदेह ठेवला आहेच. हा मृतदेह सकीनाचाच आहे म्हणजे सिनेमात सकीना मृत्यू होतो असा अंदाजा चाहत्यांनी लावायला सुरुवात केली. शेवटी अमिषाने खरं काय ते सांगूनच टाकलं. यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ती म्हणाली, ' प्रिय चाहत्यांनो, तुम्ही गदर मधील ज्या शॉटमुळे परेशान होत आहात की सकीनाचा मृत्यू झाला आहे. तर तसं नाहीए. व्हिडिओत ती महिला कोण आहे याबद्दल मी आता काहीच सांगू शकत नाही पण ही सकीना अजिबातच नाही. त्यामुळे तुम्ही परेशान होऊ नका. सगळ्यांना खूप प्रेम.'
अमिषाने केलेल्या या खुलाश्यानंतर युजर्स कमेंट करत तिला ट्रोल करत आहेत. 'तुला डोकं नाही का जो सस्पेन्स होता तोच सांगितला ', 'असं तर तू सगळा पिक्चरच सांगशील' अशा कमेंट्स तिच्या पोस्टवर आल्या आहेत.
आता अमिषाच्या या पोस्टवर सनी देओल काय प्रतिक्रिया देतो हे बघावे लागेल.