या अभिनेत्रीच्या विरोधात कोर्टाचे अटक वॉरंट, बिग बॉसमुळे आलीय चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 16:34 IST2019-10-12T16:14:43+5:302019-10-12T16:34:28+5:30
अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते.

या अभिनेत्रीच्या विरोधात कोर्टाचे अटक वॉरंट, बिग बॉसमुळे आलीय चर्चेत
अभिनेत्री अमिषा पटेल तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. आजतकच्या रिपोर्टनुसार अमिषाच्या विरोधात रांचीतील कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. अमिषावर निर्माता अजय कुमार यांनी अडीच कोटी रुपयांचा चेक बाऊंस आरोप केला. 2018 मध्ये आलेला देसी मॅजिक चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अमिषाने अजय कुमार सिंग यांच्याकडून 3 कोटी रुपये उसणे घेतले होते.
त्यानंतर अजय कुमार जेव्हा अमिषाकडे पैसे मागियचे तेव्हा एकतर ती टाळाटाळ करायची किंवा काहीच उत्तर द्यायची नाही असा आरोप त्यांनी केला आहे. आर्थिक संकटामुळे हा प्रोजेक्ट मध्येच थांबला त्यावेळी निर्मात्याने तिच्याकडून पैसे मागायची सुरुवात केली असे त्यांचे म्हणणे आहे. अमिषाने त्यांना अडीच कोटीचा चेक दिलासुद्धा. मात्र तो चेक बँकेत टाकल्यावर बाऊन्स झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी अमिषाच्या विरोधात रांची कोर्टात फसवणुकीची केस सुरु आहे.
रिपोर्टनुसार अजयने कोर्टात केस दाखल केल्यानंतर अमिषाला अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने उत्तर दिले नाही.
अमिषा सध्या 'बिग बॉस 13' सिझनमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. अमिषाने घरात 'मालकीण' बनत दमदार एंट्री घेतली. मात्र अमिषा पटेलचंबिग बॉसच्या घरात येणं रसिकांच्या फारसे पसंतीस पडलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर नेटीझन्स अमिषाच्या नावाने फनी मिम्स बनवत तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी अमिषाला ‘बिग बॉस’मधून हाकलण्याची मागणी केली आहे.