काश्मीर शूटवरुन परतली Alpha गर्ल आलिया, कडेवर झोपलेली दिसली क्युट राहा; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 15:34 IST2024-09-01T15:34:07+5:302024-09-01T15:34:34+5:30
लेक राहासोबतचा आलियाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

काश्मीर शूटवरुन परतली Alpha गर्ल आलिया, कडेवर झोपलेली दिसली क्युट राहा; Video व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) नुकतीच काश्मीर वरुन परतली आहे. शर्वरी वाघसोबत आलिया काही दिवस काश्मीर येथे शूटसाठी गेली होती. यशराज फिल्म्सच्या अॅक्शनपॅक 'अल्फा' सिनेमात या दोघीही झळकणार आहेत. तेथील शूटचा एक फोटोही आलियाने काल अपलोड केला होता. नुकतीच आलिया मुंबईत परत आली आहे. लेक राहासोबतचा तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
आलिया भट काश्मीर शूटवर लेक राहालाही घेऊन गेली होती. मायलेकीचा कलिना एअरपोर्टवरचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये आलिया बाहेर पडताना दिसत आहे. तर तिच्या कडेवर चिमुकली राहा आहे. राहा आलियाच्या कडेवर शांत झोपलेली दिसत आहे. राहा झोपली असल्याने आलिया कॅमेऱ्यासमोर पोज न देताच गाडीत बसते. तसंच मिडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूरही गाडीत होता तो बायको आणि लेकीला घ्यायला आला होता. आलिया आणि राहाची झलक पाहताच चाहते खूश झालेत.
आलिया आणि रणबीरची लेक राहा आता दीड वर्षांची आहे. ती नेहमीच आपल्या क्युटनेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. अनेकदा तिच्यात आलियाचीच झलक दिसते. राहाचे बरेचसे एक्सप्रेशन हे आलियासारखेच असतात. मायलेकीचे अनेक सारखे दिसणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.