‘पुष्पा 2’नंतर बॉलिवूडवर पुष्पा 'राज', अल्लू अर्जुनच्या संदर्भातील मोठी बातमी आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 13:36 IST2023-03-03T13:27:24+5:302023-03-03T13:36:25+5:30
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आता बॉलिवूडमध्येही दहशत निर्माण करण्याच्या तयारीत आहे.

‘पुष्पा 2’नंतर बॉलिवूडवर पुष्पा 'राज', अल्लू अर्जुनच्या संदर्भातील मोठी बातमी आली समोर
Allu Arjun Team Up With Bhushan Kumar: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आता बॉलिवूडमध्येही दहशत निर्माण करण्याच्या तयारीत आहे. 'पुष्पा' स्टारने चित्रपट निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यासोबत एक मोठा प्रोजेक्ट साईन केला आहे. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज फिल्म्स प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्स करणार आहेत.
अल्लू अर्जुनसोबत भूषण कुमार यांनी साईन केला चित्रपट
अल्लू अर्जुन, भूषण कुमार, संदीप रेड्डी वांगा, प्रणय रेड्डी वांगा, सह-निर्माता शिव चन्ना यांची नुकतीच भेट झालीय. त्याचवेळी टी-सीरीजनेही आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर करून याची घोषणा केली आहे. फोटोमध्ये अल्लू अर्जुन, भूषण कुमार आणि संदीप रेड्डी वंगा एकत्र पोझ देताना दिसत आहेत. अल्लू अर्जुन हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी सज्ज झाला आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या स्पिरिटच्या शूटिंगनंतर शीर्षक नसलेल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
Brace yourselves for this massive collaboration between three powerhouses of India - Producer Bhushan Kumar, Director Sandeep Reddy Vanga and superstar Allu Arjun.@alluarjun@imvangasandeep#BhushanKumar#KrishanKumar@VangaPranay@VangaPictures#ShivChanana@NeerajKalyan_24pic.twitter.com/xis8mWSGhl
— T-Series (@TSeries) March 3, 2023
T-Series ने या आगामी प्रोजेक्टची घोषणा करताना ट्विटमध्ये लिहिले आहे की, "भारतातील तीन पॉवरहाऊस निर्माते भूषण कुमार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्यातील मोठ्या सहकार्यासाठी स्वत:ला तयार करा." फोटोत अल्लू अर्जुन राखाडी टी-शर्टमध्ये दिसत आहे, निर्माता भूषण कुमार त्याच्या उजवीकडे उभा आहे, तर संदीप रेड्डी वंगा त्याच्या शेजारी पोज देताना दिसत आहे. फोटोत प्रणय वांगा आणि शिव चन्ना देखील दिसत आहेत.