Pushpa: बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली होती O Antavaची ऑफर; 'या' कारणामुळे गमावली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 18:02 IST2022-02-11T17:56:49+5:302022-02-11T18:02:50+5:30

Pushpa: या चित्रपटातील कथानक आणि कलाकारांच्या अभिनयासह त्यातील गाणीदेखील खासकरुन गाजली. त्यातलंच एक गाणं म्हणजे O Antava.

allu arjun pushpa the rise samantha prabhu pushpa song o antava offer to nora fatehi first | Pushpa: बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली होती O Antavaची ऑफर; 'या' कारणामुळे गमावली संधी

Pushpa: बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली होती O Antavaची ऑफर; 'या' कारणामुळे गमावली संधी

गेल्या दोन महिन्यांपासून सोशल मीडियावर एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे पुष्पा. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. विशेष म्हणजे या चित्रपटातील कथानक आणि कलाकारांच्या अभिनयासह त्यातील गाणीदेखील खासकरुन गाजली. त्यातलंच एक गाणं म्हणजे O Antava. पुष्पामधील या आयटम साँगमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Prabhu) झळकली आहे. परंतु, या गाण्यापूर्वी एका बॉलिवूड अभिनेत्रीला ऑफर देण्यात आली होती. हे फार मोजक्या जणांना माहित आहे. 

O Antavaच्या निमित्ताने समंथा पहिल्यांदाच आयटम साँग करतांना दिसली. विशेष म्हणजे या गाण्यासाठी तिने तगडं मानधनदेखील घेतल्याचं सांगण्यात येतं. परंतु,तिच्या पूर्वी हे गाणं बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)  हिला ऑफर करण्यात आलं होतं. मात्र, एका कारणास्तवर नोराने हे गाणं करण्यास नकार दिला.

या कारणामुळे नोराने दिला नकार

सूत्रांच्या माहितीनुसार, नोराला या गाण्याची ऑफर दिल्यानंतर तिने मोठ्या मानधनाची मागणी केली होती. परंतु, मेकर्सने इतकी मोठी रक्कम देण्यास नकार दिला. तसंच काहींच्या मते, नोरानंतर हे गाणं दिशा पटानीला ऑफर करण्यात आलं होतं. मात्र, तिने दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये आयटम साँग करण्यास इच्छू नसल्याचं सांगितलं. त्यानंतर हे गाणं समंथाला मिळालं. परंतु, हे गाणं बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झालं.
 

Web Title: allu arjun pushpa the rise samantha prabhu pushpa song o antava offer to nora fatehi first