'हाऊसफुल ४'मधील सर्व कॅरेक्टर्सचे पोस्टर झाले रिलीज, पोस्टर्समध्ये कलाकार दिसले वेगळ्याच अवतारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 18:02 IST2019-09-25T18:01:56+5:302019-09-25T18:02:45+5:30
'हाऊसफुल ४' चित्रपटाचे पोस्टर्स पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

'हाऊसफुल ४'मधील सर्व कॅरेक्टर्सचे पोस्टर झाले रिलीज, पोस्टर्समध्ये कलाकार दिसले वेगळ्याच अवतारात
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा आगामी चित्रपट हाऊसफुल ४ची उत्सुकतेनं वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी या तील सर्व मुख्य कॅरेक्टर्सचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये सगळे कलाकार वेगळ्याच अवतारात पहायला मिळत आहेत.
फॉक्स स्टार इंडियाने पोस्टर रिलीज करत लिहिलं की, कथेची सुरूवात केली होती बालाने १४१९मध्ये, मात्र संपवणार हॅरी २०१९मध्ये. या वेडेपणासाठी तयार आहेत. हाऊसफुल ४ चित्रपटाचा ट्रेलर २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
तसेच इतर कलाकारांचेही पोस्टर्स सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. रितेश देशमुख या सिनेमात बांगडू आणि रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे.
बॉबी देओल साकारणार आहे धरमपुत्राची भूमिका.
तर क्रिती सेनॉन हाऊसफुल४ मध्ये दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ती सितामगडची राजकुमारी मधू आणि लंडनची किर्तीच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.
पूजा हेगडे राजकुमारी माला आणि पूजाच्या भूमिकेत अनोखी कथा सादर करताना या चित्रपटात दिसणार आहे.
तर क्रिती खरबंदा नेहा आणि मीनाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
यापूर्वी अक्षय कुमारने हाऊसफुल ४चा मोशन पोस्टर प्रदर्शित केला होता. त्यात सांगितलं होतं की या चित्रपटाची कथा १४१९ आणि २०१९ सालातील आहे. हा चित्रपट मल्टीस्टारर असून यात अक्षय कुमार सोबत बॉबी देओल, रितेश देशमुख, कृति खरबंदा, कृति सेनॉन, राणा दुग्गाबत्ती, पूजा हेगडे व चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवालाने केली आहे. याआधी या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान करत होते. मीटूचा आरोप लागल्यानंतर त्याला हा चित्रपट सोडावा लागला. त्यानंतर या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजीने केलं.