आलिया म्हणते, उडता पंजाबमध्ये काम करणे अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 17:29 IST2016-06-24T11:59:26+5:302016-06-24T17:29:26+5:30

स्टुडंटस् आॅफ द इअरपासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाºया आलियाने उडता पंजाबमध्ये बिहारी स्थलांतरिताची भूमिका साकारली आहे. आलियाने आपल्या अभिनयाने ...

Aliya says, flying is difficult to work in Punjab | आलिया म्हणते, उडता पंजाबमध्ये काम करणे अवघड

आलिया म्हणते, उडता पंजाबमध्ये काम करणे अवघड

टुडंटस् आॅफ द इअरपासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाºया आलियाने उडता पंजाबमध्ये बिहारी स्थलांतरिताची भूमिका साकारली आहे. आलियाने आपल्या अभिनयाने समीक्षकांसह अनेकांना अभिनयाला दाद देण्यास भाग पाडले आहे. 
‘प्रत्येक भूमिका ही माझ्यासाठी वेगळी असते, परंतु मी दिग्दर्शकांची अभिनेत्री आहे. दिग्दर्शकांकडून मला जर योग्य दिशा आणि अचूक मार्गदर्शन मिळाले तर माझ्यासाठी गगन ठेंगणे आहे, असे आलियाने बोलताना सांगितले.
वयाच्या २३ व्या वर्षी आलिया वेगवेगळ्या भूमिका कशा सहज पद्धतीने करते याचीच सर्वत्र चर्चा आहे. चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची आलिया ही कन्या. प्रत्येक चित्रपटात पात्रांमध्ये सामावले जाणे वेगवेगळ्या पद्धतीचे असते असे तिला वाटते. 
‘हे चित्रपटावर अवलंबून असते. उडता पंजाबमध्ये काम करताना मी अनेक गोष्टींची तयारी केली. संवादफेक आणि शरीरभाषा बदलली. दिग्दर्शकाने सांगितलेल्या सूचनेनुसार मी काम करते, असे आलिया म्हणाली.
उडता पंजाब हा अत्यंत अवघड चित्रपट होता, असे आलियाला वाटते. 

Web Title: Aliya says, flying is difficult to work in Punjab