आलिया -राजामौली यांच्यात शीतयुद्ध?; RRR च्या रिलीजनंतर 'या' कारणामुळे अभिनेत्री झाली नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 13:34 IST2022-03-29T13:33:09+5:302022-03-29T13:34:00+5:30

Alia bhatt:आलियाने तिच्या सोशल मीडियावरुनही RRR संदर्भातील काही पोस्ट डिलीट केल्या आहेत. केवळ या चित्रपटातील तिच्या लूकसंदर्भातील फोटो तिने ठेवले आहेत.

alia bhatt unhappy with ss rajamouli and unfollowed him on instagram post rrr release | आलिया -राजामौली यांच्यात शीतयुद्ध?; RRR च्या रिलीजनंतर 'या' कारणामुळे अभिनेत्री झाली नाराज

आलिया -राजामौली यांच्यात शीतयुद्ध?; RRR च्या रिलीजनंतर 'या' कारणामुळे अभिनेत्री झाली नाराज

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या गंगुबाई काठियावाडी आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'आरआरआर' (RRR) या चित्रपटांमुळे चर्चेत येत आहे.  या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने केलेल्या अभिनयामुळे सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे RRR च्या माध्यमातून आलियाने दाक्षिणात्य कलाविश्वात पदार्पण केलं आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडसह टॉलिवूडमध्येही तिची चर्चा रंगली आहे. या चर्चांमध्येच आता RRR चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्यावर आलिया नाराज झाल्याचं सांगण्यात येत आहे.

RRR चे दिग्दर्शक राजामौली यांच्यामुळेच आलियाला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र, हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ती नाराज झाल्याचं दिसून आलं. इतंकच नाही तर तिने तिच्या सोशल मीडियावरुनही RRR संदर्भातील काही पोस्ट डिलीट केल्या आहेत. केवळ या चित्रपटातील तिच्या लूकसंदर्भातील फोटो तिने ठेवले आहेत.

राजामौलींवर का नाराज झाली आलिया?

RRR या चित्रपटात आलियाने सीताची भूमिका साकारली आहे. मात्र, या चित्रपटात तिला कमी स्क्रिन स्पेस मिळाल्यामुळे ती नाराज झाली आहे. विशेष म्हणजे रागाच्या भरात तिने राजामौली यांनी सोशल मीडियावरुनही अनफॉलो केलं आहे. मात्र, याविषयी आलियाने अद्याप कोणतंही भाष्य केलं नसून तिने याप्रकरणी मौन बाळगलं आहे.

दरम्यान, या चित्रपटात आलियासोबत ज्युनिअर एनटीआर, रामचरण आणि अजय देवगणदेखील झळकले आहेत.मात्र, या दिग्गज कलाकारांच्या तुलनेत आलियाला कमी स्पेस मिळाल्याचं सांगण्यात येतं. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड करत आहे. या चित्रपटाने सोमवारप्रर्यंत १७ कोटींची कमाई केली होती

Web Title: alia bhatt unhappy with ss rajamouli and unfollowed him on instagram post rrr release