आलियासाठी 'ही' व्यक्ती आहे प्रचंड खास; मोबाईल स्क्रिनवरही ठेवलाय फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 13:51 IST2021-11-15T13:50:56+5:302021-11-15T13:51:34+5:30

Alia bhatt: सध्या सोशल मीडियावर आलिया आणि रणबीर कपूरच्या (ranbir kapoor) लग्नाची चर्चा रंगत असतानाच तिच्या मोबाईल फोनचीही चर्चा रंगू लागली आहे.

alia bhatt reveals her phone wallpaper featuring ranbir kapoor | आलियासाठी 'ही' व्यक्ती आहे प्रचंड खास; मोबाईल स्क्रिनवरही ठेवलाय फोटो

आलियासाठी 'ही' व्यक्ती आहे प्रचंड खास; मोबाईल स्क्रिनवरही ठेवलाय फोटो

करण जोहरच्या (karan johar) 'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट (alia bhatt).  उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर आज आलियाने तिचा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला आहे. विशेष म्हणजे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.  सध्या सोशल मीडियावर आलिया आणि रणबीर कपूरच्या (ranbir kapoor) लग्नाची चर्चा रंगत असतानाच तिच्या मोबाईल फोनचीही चर्चा रंगू लागली आहे. अलिकडेच आलियाने तिच्या मोबाईल स्क्रीनवर कोणाचा फोटो ठेवलाय याचा खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच आलियाने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये तिने तिचा डे प्लॅन सांगितला आहे.  विशेष म्हणजे यावेळी तिने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरही दिली. यामध्येच आलियाच्या मोबाईलचा स्क्रिन सेव्हर काय? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर तिने उत्तर दिलं आहे.

आलियाने या व्हिडीओमध्ये तिच्या मोबाईलचा स्क्रिन सेव्हर दाखवला आहे. यात तिच्या जीवनातील खास व्यक्तीसोबतचा सेल्फी असल्याचं पाहायला मिळत आहे. आलियाने तिच्या मोबाईलवर रणबीर कपूरसोबतचा एक सेल्फी ठेवला आहे.

दरम्यान, आलियाच्या मोबाईलवरील हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी तिला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला आहे. त्यावर आलियाने हटके अंदाजात  उत्तर दिलं. आलियाने कोणतंही वक्तव्य न करता केवळ हावाभावतून तिचं मत मांडलं. त्यामुळे लग्नाच्या प्रश्नाचं उत्तर तिने सहज टाळल्याचं दिसून आलं.
 

Web Title: alia bhatt reveals her phone wallpaper featuring ranbir kapoor