Video: हे काय?? भान विसरुन प्रेग्नंट आलियाने केला पार्टीत डान्स; रणवीरही दिसला पार्टी मूडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 18:01 IST2022-07-26T18:00:36+5:302022-07-26T18:01:13+5:30

Alia Bhatt: आलिया लवकरच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण पूर्ण झालं असून सेटवर कलाकारांनी जंगी पार्टी केल्याचं पाहायला मिळालं. वि

alia bhatt ranveer singh dance video on channa mereya as wrapped up rocky aur rani ki prem kahani movie | Video: हे काय?? भान विसरुन प्रेग्नंट आलियाने केला पार्टीत डान्स; रणवीरही दिसला पार्टी मूडमध्ये

Video: हे काय?? भान विसरुन प्रेग्नंट आलियाने केला पार्टीत डान्स; रणवीरही दिसला पार्टी मूडमध्ये

'स्टुडंट ऑफ द इअर', 'गली बॉय' अशा कितीतरी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांवर छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट (Alia Bhatt) . काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणबीर कपूरसोबत (ranbir kapoor) लग्नगाठ बांधणारी आलिया लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. यामध्येच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात प्रेग्नंट असतानाही ती बिंधास्त डान्स करताना दिसत आहे.

आलिया लवकरच करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शन अंतर्गत निर्मिती करण्यात येत असलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंग ( Ranveer Singh) स्क्रीन शेअर करणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण पूर्ण झालं असून सेटवर कलाकारांनी जंगी पार्टी केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या पार्टीत आलिया डान्स करताना दिसून आली. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ करण जोहरने त्याच्या इन्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया बिंधास्तपणे डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तिचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी प्रेग्नंसी काळात असा डान्स करणं योग्य नसल्याचं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.

दरम्यान,  या व्हिडीओमध्ये आलिया रणबीरच्या 'चन्ना मेरेया' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. फक्त आलियाच नाही तर तिच्यासोबत रणवीरदेखील नाचताना दिसत आहे. 'माझ्या राणीचं रॅप-अप झालं आहे. त्यानिमित्तानं माझा रॉकी बघा कसा तिला चिअरअप करत आहे. राणीचं काम पूर्ण झालं आहे आता रॉकी तू देखील रॅप अप करून मैदानात ये...' , असं कॅप्शन करणने या व्हिडीओला दिलं आहे.
 

Web Title: alia bhatt ranveer singh dance video on channa mereya as wrapped up rocky aur rani ki prem kahani movie