पॅरिसवरुन मुंबईत परतली कपूर फॅमिली, चिमुकल्या राहाला होतोय कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा त्रास; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 16:30 IST2024-09-25T16:29:37+5:302024-09-25T16:30:17+5:30
त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पॅरिसवरुन मुंबईत परतली कपूर फॅमिली, चिमुकल्या राहाला होतोय कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा त्रास; Video व्हायरल
अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhat) नुकतंच पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पण केलं. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पॅरिस फॅशन इव्हेंटमध्ये आलियाने रॅम्प वॉक केला. तिला सपोर्ट करण्यासाठी रणबीर कपूर आणि नीतू कपूरही पॅरिसमध्ये होते. शिवाय त्यांची क्युट लेक राहा सुद्धा आईवडिलांसोबत पॅरिसमध्ये होती. आता नुकतंच कपूर कुटुंब मुंबईत परतलं आहे. त्यांचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल होतोय.
आलिया भट, रणबीर कपूर, राहा आणि नीतू कपूर काही दिवसांपूर्वीच पॅरिसला रवाना झाले होते. तेव्हा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात राहा आजीला पाहून खूप खूश झाली होती. तसंच पहिल्यांदाच ती बोबड्या भाषेत बोलताना दिसली. आता हे चौघंही मुंबईत परतले आहेत. पुन्हा त्यांचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल होतोय. यातही सर्वांची नजर चिमुकल्या राहावरच खिळली आहे. आजी नीतू राहाला किस करते आणि पुढे जाते. तर राहा पापाराझींकडे कुतुहलाने पाहत असते. या सगळ्यात तिला कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा मात्र त्रास होताना स्पष्ट दिसून येतो. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पॅरिस फॅशन वीकमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायचाही जलवा पाहायला मिळाला. ऐश्वर्या गेल्या काही वर्षांपासून यामध्ये सहभागी होते. आलियाची मात्र ही पहिलीच वेळ होती. मेटॅलिक ड्रेसमध्ये आलियाने रॅम्प वॉक केला. यावेळी ती प्रचंड कॉन्फिडंट दिसत होती. आलियावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय.
आलिया भटचा 'जिगरा' ११ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. तिने आणि करण जोहरने सिनेमाची निर्मिती केली आहे. बहीण भावाच्या नात्यावर सिनेमा आधारित आहे. वेदांग रैनाने आलियाच्या भावाची भूमिका साकारली आहे.