मराठी टीव्ही अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, नेटफ्लिक्सवर झळकली 'सुंदरा'; शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 11:23 IST2025-10-25T11:22:34+5:302025-10-25T11:23:03+5:30
अभिनेत्रीचा पहिला हिंदी सिनेमा नेटफ्लिक्सवर झाला रिलीज, गगनात मावेना आनंद

मराठी टीव्ही अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, नेटफ्लिक्सवर झळकली 'सुंदरा'; शेअर केली पोस्ट
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अक्षया नाईकने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिचा पहिला हिंदी सिनेमा थेट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. 'ग्रेटर कलेश'मधून तिने हिंदीत डेब्यू केला आहे. अक्षयाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
अक्षया नाईकने सिनेमाच्या स्क्रीनिंगचे काही फोटो, व्हिडिओ शेअर करत लिहिले, "पहिलं हे नेहमीच खास असतं. पण जेव्हा ते नेटफ्लिक्ससोबत असतं तेव्हा आणखी खास असतं. काल संध्याकाळपासून माझ्या कानात फक्त एकच वाक्य गुंजत होतं ते म्हणजे, 'जब तुम किसी चीज को पुरी शिद्दत से चाहो, तो पुरी कायनात तुम्हे उससे मिलाने मे लग जाती है!' मी tttofficial ला बऱ्याच काळापासून फॉलो करत आहे आणि त्यांच्या प्रोजेक्टचा भाग होण्याची माझी खूप आधीपासून इच्छा होती. पण हे कसं होणार हे माहित नव्हतं. मी ग्रेटर कलेश मॅनिफेस्ट केलं होतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही."
नेटफ्लिक्स वर नुकताच आलेला " ग्रेटर कलेश " या चित्रपटातून अक्षयाने तिच ओटीटी पदार्पण केलं आहे. या चित्रपटात तिने एक खास भूमिका केली असून ती खूप लक्षवेधी देखील ठरतेय. प्रत्येक कुटुंबात घडणाऱ्या फॅमिली ड्रामाच उत्तम उदाहरण असलेल्या या खास चित्रपटात तिने दमदार काम केलं आहे. अक्षया ने या चित्रपटात "पंखुरी" हे पात्र साकारलं असून 'ग्रेटर कलेश' हा चित्रपट जगभरात नेटफ्लिक्सवर नंबर १ वर ट्रेंड होताना दिसतोय. कोणत्याही कलाकाराची बॉलिवूड मध्ये एकदा तरी काम करण्याची इच्छा ही असतेच आणि या निमित्तानं अक्षया या खास प्रोजेक्ट चा भाग झाली आणि तिचं बॉलिवुड पदार्पण सुपरहीट ठरलं आहे.