नवीन वर्षातील अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' सिनेमाचं पोस्टर रिलीज; 'या' दिवशी येणार ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:26 IST2025-01-04T16:24:07+5:302025-01-04T16:26:21+5:30

अक्षय कुमारच्या नवीन वर्षातील पहिला सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमाचं अफलातून पोस्टर रिलीज झालंय

Akshay Kumar upcoming movie Sky Force trailer and Poster released | नवीन वर्षातील अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' सिनेमाचं पोस्टर रिलीज; 'या' दिवशी येणार ट्रेलर

नवीन वर्षातील अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' सिनेमाचं पोस्टर रिलीज; 'या' दिवशी येणार ट्रेलर

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षयचे सिनेमे म्हणजे एंटरटेनमेंटची हमखास गॅरंटी असं म्हटलं जातं. २०२४ मध्ये अक्षयचे 'बडे मिया छोटे मिया', 'स्त्री २' आणि 'खेल खेल में' हे सिनेमे रिलीज झाले. आता नवीन वर्षात अक्षयचा कोणता सिनेमा येणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर ही उत्सुकता मिटली असून नवीन वर्षातील अक्षयच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली असून 'स्काय फोर्स' असं या सिनेमाचं नाव आहे. जाणून घ्या सविस्तर

'स्काय फोर्स' सिनेमाची घोषणा

नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षय कुमारच्या आगामी 'स्काय फोर्स' सिनेमाची घोषणा आलीय. या सिनेमात अक्षय कुमार एअर फोर्स अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये अक्षयसोबत अभिनेता वीर पहारिया दिसत आहे. याशिवाय या सिनेमात सारा अली खान आणि निम्रत कौर झळकणार आहे. उद्या रविवारी (५ जानेवारी) 'स्काय फोर्स'चा ट्रेलर रिलीज होणार आहे. अक्षयचा हा सिनेमा पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.


रिलीज डेट आणि कथा काय?

'स्काय फोर्स' सिनेमा २४ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. 'स्त्री', 'मुंज्या' या सिनेमांचं हॉरर युनिव्हर्स तयार करणाऱ्या दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्मसने सिनेमाची निर्मिती केलीय. 'स्काय फोर्स' सिनेमा १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक रोमांचकारी कथा बघायला मिळणार यात शंका नाही.

Web Title: Akshay Kumar upcoming movie Sky Force trailer and Poster released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.