अक्षय कुमारला कसा वाटला 'धुरंधर'? स्पष्टच म्हणाला- "प्रौढांसाठी बनवलेला सिनेमा असून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:54 IST2026-03-24T09:49:58+5:302026-03-24T09:54:00+5:30
सध्या 'धुरंधर २'ची चांगलीच चर्चा आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा सर्वांवर छाप पाडण्यात यशस्वी झाला आहे. अशातच 'धुरंधर' बद्दल अक्षय कुमारने त्याचं मत व्यक्त केलंय.

अक्षय कुमारला कसा वाटला 'धुरंधर'? स्पष्टच म्हणाला- "प्रौढांसाठी बनवलेला सिनेमा असून..."
सध्या 'धुरंधर २'ची चांगलीच चर्चा आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा सर्वांवर छाप पाडण्यात यशस्वी झाला आहे. 'धुरंधर २' बद्दल सांगायचं तर, २०२६ मधील ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून 'धुरंधर २'चं वर्णन केलं जात आहे. अशातच 'धुरंधर' बद्दल अक्षय कुमारने त्याचं मत व्यक्त केलंय. याशिवाय 'धुरंधर २' मुळे आगामी 'भूत बंगला' सिनेमाची रिलीज डेट अक्षय कुमार बदलणार का, याही प्रश्नावर त्याने स्पष्ट मत व्यक्त केलंय.
PTI ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, ''वेगवेगळ्या विषयांवर सिनेमे बनत आहेत आणि प्रत्येक सिनेमाचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. मी धुरंधर पाहिला आणि मला हा सिनेमा खूप आवडला. धुरंधर हा प्रौढांसाठी बनवलेला सिनेमा आहे तर भूत बंगला हा सिनेमा लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाला पाहता येईल. भूत बंगला बनवताना मी ट्रेंडचा विचार नाही केला. कथा चांगली आहे की नाही, या गोष्टीला मी प्राधान्य दिलं. जर कथा चांगली असेल तर तर तो सिनेमा लोकांपर्यंत आपोआप पोहोचतो.''
"धुरंधर २' साठी ३ आठवडे पुरेसे आहेत की नाहीत, हे तर येणारा काळच ठरवेल. 'धुरंधर २' इतका चांगला चालतेय आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक सिनेमागृहात येत आहेत, याचा मला खूप आनंद आहे. या चित्रपटाने आपल्या हिंदी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे, ही खूप सकारात्मक गोष्ट आहे.''
''आपण २१ दिवसांबद्दल म्हणजेच ३ आठवड्यांबद्दल बोलत आहोत, मला वाटत नाही की यात कोणतीही अडचण येईल. धुरंधर २ चा एक वेगळा जॉनर आहे, तो अॅक्शन चित्रपट आहे, तर आमचा 'भूत बंगला' हा एक फँटसी-हॉरर आणि कौटुंबिक चित्रपट आहे. आमच्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे की सर्व चित्रपट चालले पाहिजेत; ही संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी चांगली गोष्ट आहे.", अशाप्रकारे अक्षय कुमारने 'धुरंधर २' बद्दल त्याचं सकारात्मक मत मांडलं आहे.