भूल भुलैयातील 'त्या' पॅलेसमध्ये सुरू झालं 'भूत बंगला' सिनेमाचं शुटिंग, लोकेशन काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:15 IST2025-01-08T16:15:08+5:302025-01-08T16:15:20+5:30
अक्षयने 'भूत बंगला' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले.

भूल भुलैयातील 'त्या' पॅलेसमध्ये सुरू झालं 'भूत बंगला' सिनेमाचं शुटिंग, लोकेशन काय आहे?
Akshay Kumar : 'खिलाडी कुमार' अक्षय हा सध्या त्याच्या 'स्काय फोर्स' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. २४ जानेवारी २०२५ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'स्काय फोर्स' नंतर अक्षय हा 'भूत बंगला' (Bhoot Bangla ) या चित्रपटातही दिसणार आहे. प्रियदर्शन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले.
अक्षयने 'भूत बंगला' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. नुकतंच अक्षय जयपूरमध्ये पोहचला. हे शुटिंग चौमु पॅलेसमध्ये होत असल्याची माहिती आहे. हे तेच पॅलेस आहे, जिथे अक्षयने 16 वर्षांपूर्वी भूल भुलैयाचे चित्रीकरण केले होते. आता 12 जानेवारीपर्यंत अक्षय कुमार चौमु पॅलेसमध्ये सिनेमाचे शूटिंग करणार आहे. जयपूर शेड्यूलमध्ये शहरातील प्रसिद्ध ठिकाणी अनेक आऊटडोअर शूटचा समावेश आहे.
'भूत बंगला' चित्रपटात मजेशीर ट्विस्ट असणार आहेत. आपल्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा अक्षयचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'भूत बंगला'ची निर्मिती शोभा कपूर, एकता आर कपूर आणि अक्षय कुमार यांचे प्रॉडक्शन हाऊस 'केप ऑफ गुड फिल्म्स'च्या बॅनरखाली झाली. फारा शेख आणि वेदांत बाली या चित्रपटाचे सहनिमति आहेत. तर कथा आकाश ए कौशिक यांनी लिहिली आहे, तर पटकथा रोहन शंकर, अभिलाश नायर आणि प्रियदर्शन यांनी तयार केली आहे. चित्रपटाचे संवाद रोहन शंकर यांनी लिहिले आहेत. भूत बांगला २ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.