अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चा टीझर; असरानी, राजपालसह कॉमेडीतील दिग्गज मंडळी एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:25 IST2026-03-12T13:22:09+5:302026-03-12T13:25:51+5:30

'भूलभुलेया' मधल्या हवेलीची दिसली झलक, कसा आहे भूत बंगला टीझर?

akshay kumar starrer bhoot bangla teaser directed by priyadarshan comedy actors in one frame | अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चा टीझर; असरानी, राजपालसह कॉमेडीतील दिग्गज मंडळी एकत्र

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चा टीझर; असरानी, राजपालसह कॉमेडीतील दिग्गज मंडळी एकत्र

‘भूत बंगला’ या आगामी सिनेमातूनबॉलिवूडमधील ती आयकॉनिक दिग्दर्शक-अभिनेता जोडी म्हणजेच प्रियदर्शन आणि अक्षय कुमार तब्बल १४ वर्षांच्या मोठ्या अंतरानंतर पुन्हा एकत्र येत आहे. गेल्या कित्येक वर्षांत या जोडीने हिंदी सिनेमाला अशा अनेक अविस्मरणीय आणि उत्कृष्ट कॉमेडी चित्रपटांची भेट दिली आहे, जे आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. याच वारशामुळे हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. बालाजी मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘भूत बंगला’ने त्या चाहत्यांमध्ये आधीच आठवणींची लाट निर्माण केली आहे, जे या जोडीच्या कल्ट चित्रपटांना पाहत मोठे झाले आहेत. हा चित्रपट बॉलिवूडच्या त्या सुवर्णकाळातील कॉमेडी जादूला पुन्हा जागवण्याचे वचन देतो, ज्यामध्ये आजच्या प्रेक्षकांसाठी एक नवा आणि मॉडर्न ट्विस्टही असेल.

चित्रपटाचा भीतीदायक पोस्टर आधीच चाहत्यांना उत्साहित करून गेला होता, आणि आता निर्मात्यांनी ‘भूत बंगला’चा बहुप्रतिक्षित टीझरही रिलीज केला आहे. यासोबतच एक कास्ट पोस्टरही समोर आले आहे, जे या चित्रपटाच्या भीतीदायक पण मजेशीर जगाची पहिली झलक दाखवते. कॉमेडी, हशा आणि जबरदस्त पंचलाईन्सने भरलेला हा टीझर चित्रपटाच्या अनोख्या हॉरर-कॉमेडी विश्वाचे वातावरण तयार करतो. सध्या टीझरमध्ये हॉरर एलिमेंट्स थोडेसे लपवून ठेवले असले, तरी त्याने पुढे येणाऱ्या भीतीदायक ड्रामाबद्दल उत्सुकता नक्कीच वाढवली आहे, जो हशा-मस्करीसोबत एक “स्पोक्टॅक्युलर” मनोरंजन देण्याचे आश्वासन देतो.

आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे परेश रावल, असरानी आणि राजपाल यादव यांसारख्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती. हे कलाकार लगेचच त्या जुन्या आठवणींची चमक परत आणतात, जी प्रेक्षकांना क्लासिक कॉमेडी चित्रपटांशी जोडलेली वाटते. टीझरमधील त्यांची छोटीशी झलकच त्यांनी याआधी साकारलेल्या अविस्मरणीय पात्रांची आठवण करून देते आणि त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढते.

टीझरमध्ये दाखवलेली भीतीची छोटीशी झलक ट्रेलर येण्याची उत्सुकता अधिक वाढवते, कारण त्यामध्ये हॉरर एलिमेंट्स अजून स्पष्टपणे पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. दमदार संगीत, रोचक व्हिज्युअल्स, मजेदार पंचलाईन्स आणि अक्षय कुमार-प्रियदर्शन यांच्या चित्रपटांचा खास कॉमिक फ्लेवर यांसह ‘भूत बंगला’ जुन्या आठवणी आणि नव्या मनोरंजनाचा उत्तम संगम सादर करण्याचे वचन देते. टीझरला जर मापदंड मानले, तर हॉररने भरलेल्या कॉमेडीचा तो सुवर्णकाळ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतताना दिसत आहे.

बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडच्या एका विभाग असलेल्या बालाजी मोशन पिक्चर्सने केप ऑफ गुड फिल्म्ससोबत मिळून ‘भूत बंगला’ सादर केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव मुख्य भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून, निर्माते अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर. कपूर आहेत. हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title : अक्षय कुमार की 'भूत बंगला' का टीज़र: कॉमेडी के दिग्गज 14 साल बाद साथ

Web Summary : अक्षय कुमार और प्रियदर्शन 14 साल बाद 'भूत बंगला' के लिए साथ आए। टीज़र में परेश रावल और राजपाल यादव जैसे हास्य कलाकार हैं, जो पुरानी यादों और आधुनिक हास्य का मिश्रण पेश करते हैं। फिल्म 10 अप्रैल, 2026 को रिलीज़ होगी।

Web Title : Akshay Kumar's 'Bhoot Bangla' teaser: Comedy legends reunite after 14 years.

Web Summary : Akshay Kumar and Priyadarshan reunite after 14 years for 'Bhoot Bangla,' a horror-comedy. The teaser features comedy legends like Paresh Rawal and Rajpal Yadav, promising a mix of nostalgia and modern humor, set for release on April 10, 2026.