अक्षय कुमार मालामाल! तीन महिन्यात विकले दोन आलिशान फ्लॅट्स; झाली करोडोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:20 IST2025-03-10T17:17:45+5:302025-03-10T17:20:04+5:30

Akshay Kumar sold two luxurious flats: एकीकडे फ्लॉप सिनेमे, दुसरीकडे अभिनेता होतोय मालामाल

Akshay Kumar sold two luxurious flats in three months earned crores of rupees | अक्षय कुमार मालामाल! तीन महिन्यात विकले दोन आलिशान फ्लॅट्स; झाली करोडोंची कमाई

अक्षय कुमार मालामाल! तीन महिन्यात विकले दोन आलिशान फ्लॅट्स; झाली करोडोंची कमाई

Akshay Kumar sold two luxurious flats: बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारचे (Akshay Kumar) सिनेमे सध्या फारशी कमाल दाखवताना दिसत नाहीत. गेल्या महिन्यात त्याचा 'स्काय फोर्स' सिनेमा रिलीज झाला होता. हा बऱ्यापैकी चालला. मात्र अक्षयची मोठ्या पडद्यावरची जादू काही काळापासून ओसरलेली जाणवत आहे. असं असलं तरी अक्षय एका कारणामुळे मालामाल झाला आहे. त्याने ३ महिन्याच्या काळात नुकतंच मुंबईतील दुसरं आलिशान अपार्टमेंट विकलं आहे. 

अक्षय कुमारने बोरिवली ईस्ट येथील त्याच्या आलिशान अपार्टमेंटची विक्री केली आहे. स्क्वेअर यार्ड्स नुसार, अक्षय कुमारने ४.३५ कोटींना ही डील केली आहे. इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन वेबसाईटवर या प्रॉपर्टी संबंधी माहिती नमूद केली आहे. याच महिन्यात हा करार झाला आहे. अक्षयचा हा फ्लॅट 'स्काय सिटी' इमारतीतला आहे. ओबेरॉय रिअल्टीचं हे अपार्टमेंट आहे. २५ एकरमध्ये ही सोसायटी पसरली आहे. अक्षयच्या फ्लॅटचा कार्पेट एरिआ १०७३ स्क्वेअर फीट आह. यासोबत कार पार्किंग आहे. या करारासाठी अक्षयने २६.१ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली असून ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी मोजली आहे.

अक्षयने हा फ्लॅट त्याने २०१७ साली २.३७ कोटी रुपयांना घेतला होता. याचे त्याला आज ४.३५ कोटी मिळाले आहेत. यामुळे त्याला १८३.५४ टक्क्यांचा नफा झाला आहे. याच इमारतीत अक्षयचा आणखी एक फ्लॅटही होता जो त्याने दोनच महिन्यांपूर्वी विकला. या इमारतीत अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चननेही फ्लॅट्स खरेदी केले आहेत.

Web Title: Akshay Kumar sold two luxurious flats in three months earned crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.